अक्षय कृषी फार्म तर्फे फराळ वाटप

न्यायभूमी
कोळगाव दिनांक ११ नोव्हेंबर अजिंक्य जगताप

कोळगाव ता निफाड येथे सध्या आलेल्या ऊस तोडणी कामगार आलेले आहेत दिवाळी च्या सणाला देखील आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या गावा पासून दुर आलेल्या ह्या मजुराबरोबर अक्षय कृषी फार्म चे सर्वेसर्वा श्री अक्षय कचरू वाघ व सौ वैष्णवी अक्षय वाघ यांनी आपली दिवाळी ह्या गोरगरीब कामगारा बरोबर आपलीं दिवाळी साजरी केली.

ह्या मजुरांना काही क्षण हे आनंदाने भरण्यासाठी प्रयत्न केला अक्षय कृषी फार्म हे तारुखेडले येथील प्रगतिशील शेतकरी श्री कचरू पोपटराव वाघ यांचे चिरंजीव यांनी हाती घेतले आहे.
ह्या निमित्ताने नवनवीन बि उत्पादन करून शेतकरी जास्तीत जास्त भरघोस उत्पादन घेऊन आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करतात हे बि बियाणे बाहेरच्या देशांत सुद्धा विक्री साठी जातात श्री अक्षय वाघ यांना आदर्श शेतकरी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

तसेच अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे एक दिवाळी आपल्या माणसा बरोबर ह्या उपक्रमाला सुरुवात केली.
आज ह्या ऊसतोड मजुरांची दिवाळी गोड केली ह्या प्रसंगी श्री ईश्वर गवळी, अक्षय गवळी, महेश घोटेकर, मंगेश कडाळे,गोरख पवार हे उपस्थित होते.





