Breaking
महाराष्ट्र

विचूर येथील रस्त्यांवरील खडुडे बुजविण्याचे काम सुरू

न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 8 9 9 9 4

न्यायभूमी 

विंचूर :- दि.०९ ऑक्टोंबर मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

विंचूर शहर आणि परिसरातील रस्त्यांवरील मोठमोठे खड्डे बुजविण्याचे काम अखेर सुरू झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाल्याने नागरिक त्रस्त होते.या पार्श्वभूमीवर विंचूर ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र मोरे यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग व पंचायत समितीकडे दुहेरी निवेदन सादर करून तातडीने दुरुस्तीची मागणी केली होती.

प्रशासनाने तत्काळ कारवाई करत श्रीराम चौक, विंचूर–निफाड मार्गावर खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले आहे.रोलर,जेसीबी आणि डांबर टँकरच्या सहाय्याने रस्त्यांची दुरुस्ती युद्धपातळीवर सुरू आहे.

कामाची पाहणी करण्यासाठी राजेंद्र मोरे, नानासाहेब जेऊघाले,दिलीप चव्हाण,इम्रान मोमिन,आदी ग्रामपंचायत सदस्य तसेच नागरिक उपस्थित होते.

विंचूर परिसरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम प्रशासनाने तातडीने सुरू केले आहे.श्रीराम चौक येथे अजूनही धुळीचे साम्राज्य असून तेथे तात्काळ सफाई करण्यात यावी.

ही विनंती आमच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार.”
— राजेंद्र मोरे,सदस्य,विंचूर ग्रामपंचायत

2.5/5 - (2 votes)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे