महापुरुषांनी केलेल्या कामाचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपले जीवन जगावे — डॉ.अमोल शेजवळ
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
लासलगाव दि १० जानेवारी निशिकांत पानसरे
स्री शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले सोबत फातेमा शेख यांनी केलेले स्त्री शिक्षणाचे चांगलं काम आणि गरीब महिलांसाठी केलेले कामालां अभिवादन करून सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गवर चालावे असे प्रतिपादन डॉ. अमोल शेजवळ यांनी जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा लासलगाव येथे फातेमा शेख जयंती निमित्त केले.
कार्यक्रमचे अध्यक्षस्थानी दक्षता समिती अध्यक्षा सौ, वैदीका जयदत्त होळकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून सामजिक कार्यकर्त्या डॉ संगीता सुरसे, स्वामी रिसॉर्टचे मालक बीजेपी चे रवी होळकर, राष्ट्रवादीचे लासलगाव शहर अध्यक्ष बालेश जाधव,सुरेश कुमावत,माया होळकर, कविता चव्हाण, शाहिस्ता कौसर, फराह नाज,वंदना वाडवणे, नीलम शहा, सायरा तांबोळी, डॉक्टर नाशिर, जयश्री गायकवाड, अशोक भालेराव, उपस्थित होते.
प्रस्ताविक मुख्याध्यापक साजिद अहमद यांनी केले. नाज- ऐ-वतन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्यावतीने फातिमा शेख, मौलाना अबुल कलाम आझाद प्रतिमा जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळेत भेट देण्यात आली.
नाज-ए-वतन बहुउद्देशीय सामाजिक संस्था अध्यक्षा फरीदा काझी,डॉ. संगीता सुरसे यांनी मनोगत व्यक्त करून फातेमा शेख यांना विनम्र अभिवादन केले.
अलिजा पठाण इ.४थी चित्रकला स्पर्धेत प्रथम आल्यास आ.वेदिका ताई यांचे हस्ते ट्रॉफी,प्रमाणपत्र देऊन कौतुकास थाप देण्यात आली सदर कार्यक्रमांमध्ये मोठी संख्याने विद्यार्थी, पालक, आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते.
साजिद अहमद यांच्या हस्ते सर्व प्रमुख पाहुण्यांच्या सत्कार करण्यात आले. फरीदा काझी यांनी आभार मानले.