न्यायभूमी न्यूज
सिन्नर दि २७ डिसेंबर प्रतिनिधी:-
उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत तालुकास्तरीय उल्हास नवभारत साक्षरता मेळावा ब्रह्मानंद हायस्कूल दोडी या ठिकाणी उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. ब्रह्मानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पांडूरंग केदार होते. मेळाव्याचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी राजेश ढामसे यांच्या हस्ते झाले.
व्यासपीठावर श्री. ब्रह्मानंद स्वामी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष के.पी.आव्हाड, प्रशासनाधिकारी गणेशआव्हाड, प्राचार्य एस. जी. सोनवणे , उपमुख्याध्यापक एन.पी.काकड,केंद्र केंद्रप्रमुख विजय निरघुडे, विजय खैरनार ,शिवाजी बर्गे, तानाजी पवार ,नवनाथ आढाव ,बाळासाहेब फड, संजय बोरसे, संजय आव्हाड, रामकृष्ण पाटील, उत्तम पवार, संदीप लेंडे, बागड ,भालेराव, संदीप गिते आदी उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
उल्हास नवभारत साक्षरता यशोगाथा अहवालचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
तालुक्यातील १६ केंद्रांनी १६ स्टॉलची मांडणी केलेली होती .डुबेरे केंद्राने प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया, पाथरेचे वाहतूक संबंधी, किर्तांगळीचे आपले हक्क, दापूरचे डिजिटल साक्षरता , चासचे महाराष्ट्राची लोककला ,मुसळगावचे पारंपारिक खेळ, वावीचे पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यावर आधारित खेळ, ठाणगावचे बाळाची निगा, लसीकरण व आहार, दापूरचे आहार आणि आरोग्य, विंचूर दळवी चे दैनंदिन जीवनातील विज्ञान व तंत्रज्ञान,सोनांबेचे डिजिटल साक्षरता, पैशाची देवाण-घेवाण व शेतीविषयक , दोडीचे डायर प्लॅन, ब्राह्मणवाडेचे सर्व विषय तसेच शहा,बारागाव पिंप्री व मऱ्हाळ या केंद्रानीही विविध विषयावर स्टॉल मांडणी केली होती.
शिक्षण विस्तार अधिकारी कैलास सांगळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यासाठी हा मेळावा असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष पांडुरंगशेठ केदार मेळाव्याचे कौतुक करून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थी व शिक्षक यांच्यात उत्तम संवाद साधून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे केदार म्हणाले.
यावेळी बोलताना कार्यक्रमाचे उद्घाटक गटशिक्षणाधिकारी राजेश डामसे म्हणाले की, निरक्षर लोकांना साक्षर करून त्यांना काळानुरूप बदलणाऱ्या गोष्टी शिकविण्यासाठी उल्हास नवभारत साक्षरता हा कार्यक्रम शासनाने आयोजित केलेला आहे.निरक्षर लोकांना साक्षर करून त्यांना सर्व क्षेत्रात ज्ञान देणे आवश्यक आहे.
या मेळाव्यात डुबेरे केंद्राचा मतदान जनजागृती स्टॉल लक्षवेधी ठरला.या प्रसंगी गटशिक्षण अधिकारी राजेश डामसे, बीट विस्तार अधिकारी कैलास सांगळे यांचेसह सर्व केंद्रप्रमुख तसेच असंख्य शिक्षकांनी प्रत्यक्ष मतदानाचा पवित्र हक्क बजावला.हा
स्टॉल यशस्वितेसाठी डुबेरे केंद्राचे केंद्रप्रमुख विजय निरगुडे ,केंद्रातील शिक्षक ज्ञानेश्वर खुर्चे, अशोक पांगारकर , राजेंद्र कोकाटे , सोमनाथ गिरी , रफिक शेख , कैलास पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.
पाटपिंपरी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘ संस्कृती आपली भारी ‘ या विषयावर नाटिका सादर केली. सूत्रसंचालन संदीप तांबे यांनी तर आभार केंद्रप्रमुख उत्तम पवार यांनी मानले.
मेळावा यशस्वी करण्यासाठी विविध केंद्रातील शिक्षकांसह दोडी हायस्कूल मधील शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेतले.