ग्राहक पंचायत महाराष्ट्र चे दिनांक १३जून२०२६ रोजी घोटी येथे एकदिवसीय राज्य अभ्यास वर्गाचे आयोजन
न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य सपादक दत्तात्रय दरेकर
न्यायभूमी
नाशिक दि.०६ जून
ग्राहक पंचायत महाराष्ट्र चा नाशिक जिल्हा तसेच अहिल्या नगर जिल्ह्याच्या सदस्यांसाठी एकत्रित एकदिवसीय अभ्यास वर्ग आयोजित करण्यात आला आहे.
या अभ्यास वर्गास नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री मा. गिरीशजी महाजन तसेच अन्न व नागरी तसेच ग्राहक संरक्षण मंत्री मा.छगनरावजी भुजबळ,मा नरहरी झिरवाळ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र चे राज्याध्यक्ष डॉ विजय लाड,अरुणजी वाघमारे साहेब हे सदस्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
या अभ्यास वर्गाचा तळागाळातील नागरिकांपर्यंत ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांचा प्रसार व प्रचार पोहोचवणे,शेतकरी,ग्राहक, आदिवासी,सर्वसामान्य नागरिक यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणे.
तसेच शासन व प्रशासन यांच्यामधील दुवा म्हणून प्रभावी कामकाज उभारणे.हा या अधिवेशनाचा मुख्य उद्देश आहे.
अशी माहिती ग्राहक पंचायत महाराष्ट्र नाशिक जिल्हा अध्यक्ष डॉ संजय पाटील तसेच उपाध्यक्ष श्री वसंत दंडवते यांनी दिली.


