Breaking
आरोग्य व शिक्षण

डुबेरे जनता विद्यालयात गुरु-शिष्य पुण्यतिथी साजरी

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 8 9 9 9 5

न्यायभूमी न्यूज 

 सिन्नर दि सोमनाथ गिरी प्रतिनिधी-

डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कर्मवीर काकासाहेब वाघ व सहकार महर्षी माधवराव बोरस्ते यांची गुरु -शिष्य पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

  कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक रंगनाथ उगले होते.व्यासपीठावर पर्यवेक्षक उल्हास पवार,पी.आर.करपे,सोमनाथ गिरी,विद्या ठाकरे,रेखा खंडीझोड,वरिष्ठ लिपीक राणी शिंदे,रोहिणी भगत आदी उपस्थित होते.

उपस्थितांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष व विद्यालयाचे मुख्याध्यापक रंगनाथ उगले म्हणाले की,कर्मवीर काकासाहेब वाघ यांनी बहुजनांच्या मुलांकरता शिक्षणाची गंगोत्री य खेड्या- पाड्यांमध्ये पोहोचवली.

तसेच त्यांच्या राजकीय,शैक्षणिक व सामाजिक कार्याची माहिती दिली.तसेच त्यांनी शिष्य सहकार महर्षी माधवराव बोरस्ते यांच्या कार्याची माहिती दिली.

प्रणव पावसे,ईश्वरी गुरव या विद्यार्थ्यांनी कर्मवीर काकासाहेब वाघ व सहकार महर्षी माधवराव बोरस्ते यांच्या कार्याचा परिचय करून दिला.इयत्ता आठवी तु-अ च्या वर्गशिक्षिका सीमा गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन केले.

सूत्रसंचालन प्रणाली गुरव हिने तर आभार गायत्री शिंदे हिने मानले.

      कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे