Breaking
महाराष्ट्र

अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान श्रीमंतयोगी शिवाजी महाराज यांचा 395 वा शिवजन्मोत्सव सोहळ्या निमित्त कोटमगाव येथे भव्य व्याख्यान सोहळा

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 5 3 0 5

न्यायभूमी न्यूज 

कोटमगाव दि १८ फेब्रुवारी प्रतिनिधी ज्ञानेश्वर भवर 

       सविस्तर वृत्त असे की, दि.16-2-2025 रोजी अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत व स्मृति स्थान छत्रपती शिवाजी महाराज यांचा 395 वा शिवजन्मोत्सव सोहळा निफाड तालुक्यातील कोटमगाव येथे भव्य दिव्य रोषणाईत साजरा करण्यात आला.

एक आगळावेगळा जन्मोत्सव प्रथमच कोटमगाव शिवजयंती उत्सव समितीने आयोजित केला जगापुढे एक आगळावेगळा आदर्श दाखवला समाजामध्ये आपल्या संस्कृतीवर या व्याख्यानाचा परिणाम व्हावा व आपले हिंदू राष्ट्र होण्यासाठी ज्या मराठा मावळे व पगड जातीतील मावळ्यांचा इतिहास आपल्या कुटुंबातील व समाजातील जनते पर्यंत पोहचून त्यांचा आदर्श मिळावा व तोच आदर्श घेऊन आपण पुढील जीवनात आकस्मित करावा या उद्देशाने कोटमगाव येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीने व्याख्यान आयोजित केले होते.           

   या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील शिवव्याख्याते श्री. सुदर्शन शिंदे साहेब व रील स्टार शेतकरी पुत्र श्री  बबलू पाटील व श्री तुषार देवरे यांना आमंत्रित करण्यात आले होते. प्रथम प्रमुख पाहुण्यांचे ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या अतीस बाजित आगमन झाले त्यांचे महिला भगिनींनी पूजन करून कोटमगाव सार्वजनिक उत्सव समितीने पुष्प माळा घालून स्वागत केले यानंतर रील स्टार श्री बबलू पाटील यांनी आपल्या मनोरंजनातून बाळ गोपलाचे मन हरपून घेतले.

         यानंतर महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिवव्याख्याते श्री. सुदर्शन शिंदे साहेब यांनी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास कोटमगाव व परिसरातील प्रेक्षकांसमोर इतिहास मांडला. तब्बल दीड तास या व्याख्यानात परिसरातील व कोटमगाव ग्रामस्थ यांचे मन हरपून गेले.             

 या कार्यक्रमाची प्रस्ताविक श्री तुषार  देवरे यांनी सादर केले तसेच कोटमगाव सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीने कार्यक्रमाची रूपरेषा सांभाळली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 5 3 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे