विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये पत्रकार सन्मान सोहळा व आनंद मेळावा उत्सवात संपन्न
न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी न्यूज महाराष्ट्र
विचूर दि.११ जानेवारी मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

दिनांक १० जानेवारी २०२५ रोजी विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ कला-विज्ञान महाविद्यालयात स्काऊट-गाईड उपक्रमांतर्गत शालेय बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
विद्यार्थ्यांनी स्वतः साकारलेल्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून आनंदाचा बाजार भरवत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार देवढे यांनी प्रास्ताविकातून बाल आनंद मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवहारिक ज्ञानाचा अनुभव मिळावा.
स्वावलंबन,आर्थिक व्यवहार,नियोजन आणि संघभावना यांचे महत्त्व समजावे,हा या उपक्रमामागील मुख्य हेतू असल्याचे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून पत्रकार दिनानिमित्त उपस्थित पत्रकारांचा यथोचित सन्मान करण्यात आला.यावेळी ज्येष्ठ पत्रकार किशोर पाटील यांनी विद्यार्थ्यांना लोकशाहीतील चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेचे महत्त्व, जबाबदाऱ्या व समाजातील भूमिका सविस्तरपणे समजावून सांगितली.
यानंतर रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य डॉ. सुजित गुंजाळ, कार्यक्रमाचे अध्यक्ष व शालेय सल्लागार समितीचे अध्यक्ष जगदीश जेऊघाले, प्राचार्य नंदकुमार देवढे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजाभाऊ गोरे,उपाध्यक्ष सोमनाथ निकम आदी मान्यवरांच्या हस्ते बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.
मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी राबवलेल्या उपक्रमांचे मनापासून कौतुक करत त्यांच्या कल्पकतेचे अभिनंदन केले.

या कार्यक्रमास विंचूर डिजिटल मीडियाचे अध्यक्ष राजेश भडांगे, तसेच न्यायभूमी न्यूजचे मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर यांच्यासह सुनील क्षीरसागर, दै.लोकराष्ट्रचे,जनार्दन चव्हाण,रोहन सरोदे,मच्छिंद्र साळुंखे,अभय पाटील,संदीप धनवटे,नितीन गायकवाड,संतोष जाधव, भाऊसाहेब हुजबंद,राजेंद्र गोरे,नानाभाऊ गाडे, संदीप जोशी,गणेश पुंड,मालती जाधव,सोनाली कापडणीस,सुमन दरेकर, जेऊघाले सर, ढवण सर, आनंदी दरेकर यांच्यासह विद्यालयाचे उपमुख्याध्यापक सुरेश वाबळे,पर्यवेक्षक सुदाम माळी, ज्युनिअर विभागाचे प्राध्यापक राजेंद्र टिळेकर, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र चांदे (लाईफ मेंबर,रयत शिक्षण संस्था,सातारा) यांनी केले. बालकांनी साकारलेला हा आनंद मेळावा शिक्षणासोबतच व्यवहारज्ञान,आत्मविश्वास व सामाजिक भान वाढवणारा प्रभावी अनुभव ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.




