Breaking
आरोग्य व शिक्षण

डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षेत वाजे विद्यालयाचे घवघवीत यश 

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 8 9 9 9 4

न्यायभूमी न्यूज 

     नासिक दि २४ जानेवारी प्रतिनिधी उत्तम गारे

निफाड तालुका एज्युकेशन सोसायटी तर्फे आयोजित डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षा स्पर्धेमध्ये वाजे विद्यालयातील कार्तिक भरत शिंदे याने द्वितीय क्रमांक मिळवून वाजे विद्यालयाच्या नावलौकिकात भर टाकली आहे.

         कै.बी.पी.पाटील व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स पिंपळगाव बसवंत या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये हजारोंच्या संख्येने विद्यार्थी सहभागी झालेले होते.

            कै. बी.पी.पाटील ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स पिंपळगाव बसवंत कॉलेजचे प्राचार्य प्रकाश भंडारे , प्राध्यापिका मीनाक्षी जाधव, प्रा. कुमावत , प्रा. दिंडे , प्राध्यापिका लोखंडे मॅडम यांनी स्वतः विद्यालयांमध्ये येऊन त्या विद्यार्थ्याचे व त्याचे वडील भरत शिंदे यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब देशमुख यांच्या हस्ते गुलाब पुष्प ,३१००० (एकतीस हजार) रुपये रोख रक्कम, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यशस्वी विद्यार्थी व देणगीदारांचे संस्थेचे तालुका संचालक कृष्णाजी भगत यांनी कौतुक केले आहे .

     कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब देशमुख यांनी आलेल्या पाहुण्यांच्या कार्याचा गुणगौरव केला.तसेच विद्यार्थ्यांनी सुद्धा यासारख्या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा व यश संपादन करावे असे सांगितले. 

         तसेच विद्यालयाचा माजी विद्यार्थी महेश शंकर पवार यांनी त्यांचे वडील कै.शंकर रामचंद्र पवार यांच्या स्मरणार्थ ११००० (अकरा हजार) रुपये विद्यालयास ठेव स्वरूपात देणगी दिली.

या रक्कमेच्या व्याजातून इयत्ता दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेले प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना ही रक्कम रोख स्वरूपात देण्यात यावी असे सांगितले. यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक राम ढोली, सर्व ज्येष्ठ शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते सूत्रसंचालन जितेंद्र शिंदे यांनी केले . पर्यवेक्षक राम ढोली यांनी उपस्थितांचे आभार मानले.

मराठा विद्या प्रसारक समाज संस्था व विद्यालय नेहमीच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करीत असते. कार्तिक शिंदे यांनी मिळविलेल्या यशामुळे विद्यालयाच्या नावलौकिकात भर पडली आहे.

5/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे