Breaking
महाराष्ट्र

विंचूरच्या क भा पा विद्यालयात शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न!

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 2 0 9 7

न्यायभूमी न्यूज 

विंचूर दि १९ फेब्रुवारी मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर 

विंचूर कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

विद्यालयाची प्राचार्य देवढे एन ई हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते, सदर कार्यक्रम इयत्ता 8 ब च्या विद्यार्थ्यांनी घडवून आणला, कार्यक्रमात खालील विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांविषयी भाषणे केली धनश्री वाडेकर, सिद्धी बंदरे, जयेश जेऊघाले, आनंद उगले, अदिती जेऊघाले, स्वरूपा कापडणीस, जाधव आयुष, श्रुती जाधव, सीमा गोधडे, दिव्या गुंजाळ, श्रावणी गोराडे, धनश्री पुंड, सोळसे रेश्मा, शिवानी रोकडे, राधिका सानप, श्रद्धा जेऊघाले, श्रुतिका दरेकर, साक्षी मुद्गुल, तसेच

या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक टिळेकर आर टी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी मार्गदर्शन करताना, सांगितले की,इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर,विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारे राजा शिवछत्रपती, छत्रपती शिवाजी महाराज!, छत्रपती शिवाजी यांचे आदर्श गुण आपण सर्वांनी प्रत्यक्ष आचरणात आणले पाहिजे असे सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य देवढे एन ई यांनी, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा समाजाप्रती असणारा विशाल दृष्टिकोन व स्री विषय दृष्टिकोन समाजातील प्रत्येक घटकांनी अंगीकारला पाहिजे असे विद्यार्थ्यांना सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी गायकवाड, ईश्वरी आडेराव, अश्विनी घायाळ यांनी केले व आभार प्रदर्शन अनुजा सानप हिने केले.

या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक जोपळे के जी, चांदे आर के लाइफ मेंबर रयत शिक्षण संस्था सातारा, साळुंखे एन ए , पवार एस एम, बागुल एस जे, कुलकर्णी व्ही एस, काळे जे व्ही, निकम एम एस, तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 2 0 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे