एस एन डी अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन केंद्र मध्ये प्रथम वर्षाच्या इंजिनियरिंग मेकॅनिक्स विषयाची एक दिवसीय कार्यशाळा संपन्न
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
बाभुळगाव दि ०४ सप्टेंबर पुष्पा पाटील
बाभुळगाव येथील एस एन डी अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन केंद्र मध्ये संपन्न सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मार्फत प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या इंजिनियरिंग मेकॅनिक्स विषयाच्या नवीन आभ्यासक्रमाबाबत एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली.
या कार्यशाळेचे उद्घाटन डॉ यू . आर . आवारे डॉ डब्ल्यू एन देऊळकर डॉ अयुब शेख प्राचार्य डॉ डी एम यादव यांनी केले कार्यशाळेसाठी अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातून ५० हुन अधिक प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात नविन अभ्यासक्रमाविषयी विचारमंथन केले गेले.डॉ यू . आर.आवारी यांनी परीक्षा पद्धत , नवीन शैक्षणिक धोरण तसेच अभ्यासक्रमातील बदल याविषयी महत्वाचे मार्गदर्शन केले. डॉ डब्ल्यू एन देऊळकर यांनी ऍडव्हान्सड कन्सेप्ट ईन स्ट्रक्चर डायनॅमिक्स यावर मार्गदर्शन केले.
डॉ अयुब शेख यांनी रियल वल्ड आप्लिकेशन्स ईन इंजिनियरिंग मेकॅनिक्स यावर मार्गदर्शन केले.
तिन्ही सत्रात उपस्थित तज्ञ प्राध्यापकांनी नविन शैक्षणिक धोरण डोळ्यासमोर ठेवून अभ्यासक्रम पूर्ततेसाठी सहकार्य केले.

सुत्रसंचालन प्रा. रोहित पोटे यांनी केले. या कार्यशाळेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ स्थापत्य अभियांत्रिकीच्या अभ्यास मंडळातील सदस्य, नाशिक विभागातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते.
कार्यशाळा समन्वयक सिव्हील विभागप्रमुख डॉ यू एस अन्सारी प्रा सौरभ कासलीवाल व ईतर विभागप्रमुख उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष आमदार श्री.नरेंद्रभाऊ दराडे, आमदार श्री. किशोरभाऊ दराडे, सचिव श्री.लक्ष्मणभाऊ दराडे, व श्री.कुणालभाऊ दराडे यांनी कार्यशाळेसाठी शुभेच्छा दिल्या.


