डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा माजी विद्यार्थी आदित्य मोहन माळी यांनी जीई मेन परीक्षेत घवघवीत यश
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
सिन्नर दि १७ जुलै प्रतिनिधी ( सोमनाथ गिरी )
डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा माजी विद्यार्थी आदित्य मोहन माळी यांनी जीई मेन परीक्षेत घवघवीत यश मिळविले.
त्याला जीई मेन परीक्षेत ९९ .८२ टक्के गुण मिळाले.जीई ऍडव्हान्स ए.आय.आर.ओबीसी रँक मध्ये ७९३ क्रमांक आला.
त्याच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. विद्यालयाच्या वतीने सरपंच रामनाथ पावसे यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक रंगनाथ उगले होते.व्यासपीठावर पर्यवेक्षक उल्हास पवार ,सोमनाथ पगार, सोमनाथ गिरी,वरिष्ठ लिपिक राणी शिंदे,रोहिणी भगत,सुनील ससाणे,विद्या ठाकरे,डी.ए.रबडे, पोलीस पाटील रामदास वारुंगसे आदि उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आदित्य माळी म्हणाला की,मी दररोज आठ तास अभ्यास केला.
जिद्द आणि चिकाटी ठेवून अभ्यास केला तर यश हमखास मिळते.
सूत्रसंचालन शालेय सांस्कृतिक समितीचे प्रमुख पी.आर.करपे यांनी तर आभार कचेश्वर शिंदे यांनी मानले.

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे,तालुका संचालक कृष्णाजी भगत,संस्था शिक्षणाधिकारी डॉ.भास्कर ढोके,शालेय समितीचे अध्यक्ष नारायण वाजे,उच्च माध्यमिक समितीचे अध्यक्ष विठ्ठल वामने आदींसह शालेय समितीचे सर्व सदस्य,शिक्षक,शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी यांनी कौतुक केले.

