Breaking
आरोग्य व शिक्षण

RAWE कार्यक्रमांतर्गत गावातील शाळेत विविध उपक्रमांसह प्रजासत्ताक दिन साजरा

न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 8 9 9 9 5

न्यायभूमी 

येवला दि.२७ जानेवारी पुष्पा पाटील

कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या RAWE (Rural Agricultural Work Experience) कार्यक्रमांतर्गत गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी कवायत सादर करून शिस्त व एकतेचे दर्शन घडविले.

यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर नृत्याने उपस्थितांची मने जिंकली.तसेच कृषी विद्यार्थ्यांनी व शालेय विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व यावर प्रेरणादायी भाषणे केली.

RAWE कार्यक्रमांतर्गत कृषी विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील शिक्षण,शिस्त व राष्ट्रीय मूल्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

कार्यक्रमाच्या शेवटी शालेय विद्यार्थ्यांना चॉकलेटचे वाटप करण्यात आले, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.बाळासाहेब आहेर,उपाध्यक्ष श्री. अब्दुल शेख,तालुकाध्यक्ष छगन भाऊ आहेर,मा. जि.सदस्य कृष्णराव गुंड,मा.सरपंच अनंत आहेर, सरपंच सौ.पुष्पाताई वसंत वाघ,उपसरपंच श्री.दत्तात्रय सोनु गुंड,पोलीस पाटील मनोज आहेर,भानुदास आहेर,पानसरे सर,मधूभाऊ पानसरे,दिलीप दादा आहेर,दादाभाई शेख,सुरेश आहैर,किरण आहेर,माधव आहेर,भगवान शिरापुरे,शाळेचे मुख्याध्यापक बोराडे सर,इतर शिक्षकवर्ग सांगळे सर,काळे सर,सुरनर सर, श्रीमती.तांडगे मॅडम,मुठेकर मॅडम,गजरे मॅडम,अंबाळकर मॅडम,हापसे मॅडम,साळवे मॅडम,ग्रामस्थ तसेच RAWE कार्यक्रमातील कृषी विद्यार्थी रविंद्र जठार,विशाल कदम,मृणाल कोटमे,उमेश सावंत,दर्शन चव्हाण,दर्शन जाधव, सौरभ जाधव उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सर्वांनी देशाच्या प्रगतीसाठी कार्य करण्याचा संकल्प करत कार्यक्रम संपन्न झाला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे