Breaking
राजकिय

पंचायतराज विकास मंच जिल्हाध्यक्ष शिवा सुराशे पाटील

शिवा पाटील सुराशे हे लढवय्या शिवसैनिक म्हणून तालुक्यात त्यांची ओळख

0 8 9 9 8 4

न्यायभूमी न्यूज 

विंचूर दि २८ में अभय पाटील 

निफाड पंचायत समिती माजी सभापती तथा लासलगाव-येवला मतदारसंघ ठाकरे पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवा पाटील सुराशे यांची अखिल भारतीय सरपंच परिषद आयोजित पंचायतराज विकास मंच नाशिक जिल्हाध्यक्षपदी या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जयवंतराव पाटील यांनी त्यांना नुकतेच नियुक्तीपत्र दिले आहे.

 

निफाड तालुक्यातील टाकळी विंचूर या गावचे भूमिपुत्र असलेले शिवा पाटील सुराशे हे लढवय्या शिवसैनिक म्हणून तालुक्यात त्यांची ओळख आहे.

उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांनी आपली प्रतिमा जनमाणसात निर्माण केली आहे.

 

टाकळी विंचूर ही ग्रामपंचायत गत २५ वर्षापासून त्यांच्या नेतृत्वाखाली काम करीत आहे. तर खडकमाळेगाव पंचायत समिती गणातून त्यांनी पंचायत समिती सदस्य व निफाड तालुका पंचायत समिती सभापती म्हणून काम करत असतांना पंचायत समितीच्या व ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून करोडो रुपयांचा निधी त्यांनी निफाड तालुक्यात व लासलगाव गटात आणून विविध विकासकामांच्या माध्यमातून जनतेच्या गरजेची विकासकामे लासलगाव गट व खडकमाळेगाव गणात उभी केली आहे.

ग्रामविकासाचा दांडगा अनुभव त्यांना असल्याने ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, सरपंच यांना येणाऱ्या प्रशासकीय अडी अडचणींसाठी या विचार मंचची स्थापना पाटील यांनी केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 8 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे