क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना चालना मिळेल
सरचिटणीस ॲड नितीन ठा-करें यांचे प्रतिपादन
न्यायभूमी न्यूज
ओझर दि १५ डिसेंबर प्रतिनिधी / उत्तम गारे
‘मविप्र’ मॅरेथॉन व सांस्कृतिक महोत्सवाच्या आयोजनाने विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना चालना मिळेल असे गौरवोदगार सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे यांनी काढले. ते पुढे म्हणाले, अभ्यासा इतकेच खेळात सुद्धा विद्यार्थ्यांनी परिश्रम चिकाटी व मेहनत करून उच्च शिखर सर करून देशाचा नावलौकिक वाढवावा असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले ते ओझरच्या बोरस्ते विद्यालयात सांस्कृतिक महोत्सव बक्षीस वितरण प्रसंगी बोलत होते.
मौजे सुकेणे येथे झालेल्या केंद्रस्तरीय सांस्कृतीक महोत्सव स्पर्धेत ओझरच्या बोरस्ते विद्यालयाने उत्कृष्ट यश संपादन केले. या स्पर्धेत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी समूहगीत प्रथम, एकपात्री नाटीका प्रथम, समूहनृत्यात द्वितीय क्रमांक पटकावला. याप्रसंगी कुराश क्रीडा प्रकारात राष्ट्रीय पातळीवर निवड झालेल्या सिद्धी योगेश गांगुर्डे व सांस्कृतिक महोत्सवात समूहगीत स्पर्धेत मयुरी पाटीलने प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे उपाध्यक्ष विश्वासराव मोरे यांच्या हस्ते पारितोषिक, प्रमाणपत्र, पदक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
व्यासपीठावर मविप्र संस्थेचे उपाध्यक्ष विश्वासराव मोरे मुख्याध्यापक सोपान वाटपाडे अभिनवच्या मुख्याध्यापिका वनिता शिरसाठ बाळासाहेब ढेपले आत्माराम शिंदे उपस्थित होते.
सांस्कृतिक महोत्सव स्पर्धकांना मार्गदर्शन करणारे संगीत शिक्षिका शितल आहेर कलाशिक्षिका मोनाली निकम शितल हांडोरे श्रीमती भंडारे श्रीमती कातकाडे मोहन क्षीरसागर मनोरमा सोमवंशी उज्वला जाधव प्रभाकर लवांड यांनी परिश्रम घेतले.
यावेळी उपक्रमशील शिक्षक व विद्यार्थ्यांचे सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे यांनी कौतुक केले. नाशिक येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय सांस्कृतिक महोत्सवाच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या स्पर्धकांना याप्रसंगी मान्यवरांकडून शुभेच्छा देण्यात आल्या.
फलक रेखाटन कलाशिक्षक मोहन क्षीरसागर यांनी केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिक्षक नरेंद्र डेरले शितल हांडोरे यांनी केले.