Breaking
गुन्हेगारी

विंचूरमध्ये दिवसाढवळ्या चोरी बँकेतून काढलेले १ लाख ९० हजार रुपये डिकीतून लंपास

न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 8 9 9 9 5

न्यायभूमी 

विंचूर दि.१२ ऑक्टोंबर दत्तात्रय दरेकर 

 विचूर शहर परिसरात पुन्हा एकदा दिवसाढवळ्या चोरीची धक्कादायक घटना घडली आहे.ॲक्सिस बँकेच्या लासलगाव शाखेतून एक लाख ९० हजार रुपये काढून मोटारसायकलच्या डिकीत ठेवलेले पैसे अज्ञात चोरट्याने पळविल्याची घटना ९ ऑक्टोबर रोजी विंचूर येथे घडली.

या प्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यापूर्वीही लासलगाव व परिसरामध्ये अशा अनेक घटना घडल्या असून अद्याप पर्यंत एकही घटनेचा सुगावा न लागल्याने पोलिसांच्या तपासावर चर्चेला उधाण आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कचरू वामन चतुर (रा. मीठसागरे ता सिन्नर ) यांनी ॲक्सिस बँकेत एक वर्षासाठी ठेवलेली मुदत ठेव काढली.

त्यांनी बँकेतून रक्कम काढून ती आपल्या मोटारसायकल (एम.एच.१५-जीवाय-७०३३) च्या डिकीत ठेवली.

त्यानंतर ते विंचूर येथील जगदंबा ऑटोमोबाईल्स दुकानासमोर मोटारसायकल उभी करून थोड्या वेळासाठी दुकानात गेले.

दरम्यान,अज्ञात चोरट्याने संधी साधत मोटारसायकलच्या डिकीत ठेवलेली १ लाख ९० हजार रुपयांची रोकड आणि पावत्या लंपास केल्या. चोरट्याने अत्यंत नियोजनपूर्वक ही चोरी केल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट झाले आहे.

चोरट्याचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरू करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बँकेतून मोठी रक्कम काढणाऱ्या ग्राहकांनी सावधगिरी बाळगावी,असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

1/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे