विंचूर येथे श्री संत सावता महाराज मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
विंचूर दि २३ जुलै विशेष प्रतिनिधी सुनील क्षीरसागर
विंचूर येथील भवानी पेठेतील श्री संत सावता महाराज मंदिरात, समाधी सोहळा निमित्य अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता.
या अखंड हरिनाम सप्ताहात दररोज होणारे कार्यक्रम दुपारी ३ ते ५ ‘शिव पुराण’ ह भ प गजानन महाराज कवडकर, ‘हरिपाठ’ सायं. ५:३० ते ६:३० वा. ‘हरिकीर्तन’ सायं. ७:०० ते ९:०० वा. या काळात रोज हरिकीर्तन करणारे महाराज – ह भ प माधव महाराज पैठणकर,ह भ प निलेश महाराज निकम,ह भ प अशोक महाराज सत्रे,ह भ प निलेश महाराज पवार,ह.भ प डॉ.जलाल सैय्यद,ह भ प सागर महाराज भालेराव,ह भ प देवराम महाराज गायकवाड आणि ‘काल्याचे किर्तन’ दि.२३ बुधवार रोजी सकाळी ८ ते १० वा.ह भ प गजानन महाराज कवडकर यांनी केले.
त्यानंतर संपूर्ण गावातून ‘दिंडी प्रदक्षिणा’झाली आणि महाप्रसाद देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळी बहुसंख्येंनी माळी समाज बांधव महिला व पुरुष आणि युवक वर्ग उपस्थित होते.



