राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी सादर केले विविध प्रात्यक्षिक
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
सटाणा दि ०१ मार्च उत्तम गारे
सटाणा येथील दोधेश्वर पब्लिक स्कुल येथे आज राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रुती शेट्टी यांनी डॉ.सी.व्ही.रमण यांच्या कार्याची माहिती देत वैज्ञानिक दृष्टिकोन जीवनात महत्वाचा असल्याचे सांगितले.
यानंतर शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी अनेक विज्ञान प्रकल्प बनविले होते. इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जेवर चालणारी जनित्र, सूर्यमाला, चंद्र ग्रहण, दुसरीतील विद्यार्थी प्रणव पानपाटील याने जलचक्र, स्वरा गुंजाळ सोलार सिस्टीम, आरिश शेख याने दिशादर्शक, आर्यन कोठावदे याने वृक्ष संवर्धन तर पाचवीच्या तहूर शाह याने आधुनिक शहर, देवश्री पाटील, जवेरिया शेख यांनी चंद्रकला तर ऋषिकेश ठाकरे याने मिनी फॅन चे मॉडेल सादर केले.
इयत्ता सातवीच्या अमन पठाण याने डोअर बेल बनविली होती. इयत्ता आठवतील निसर्गा गुंजाळ, तनिष्का इंगळे यांनी हृदयाचे कार्य कसे चालते हे दाखविले.

सहावीतील वीर सोनवणे, वरद जाधव यांनी पचनसंस्था, उर्वी इंगळे, सोहा बेग, श्रुती सोनवणे, अक्षरा चव्हाण यांनी शारीरिक अवयवांची माहिती दिली, तर अजय ठाकरे, जय पवार यांनी पाण्यापासून वीज निर्मिती यासारखे विविध प्रात्यक्षिक सादर केलीत.
या सर्व प्रदर्शनाचा लाभ शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतला होता. विद्यार्थ्यांना यासाठी विज्ञान शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. कार्यालयीन प्रमुख दादा खरे, शिक्षक राहुल येशी, दीपक पाटील, विनय वालिया, मोईन शेख, शिक्षिका माधुरी देवरे, मनीषा सोनवणे, जयश्री पवार, वर्षा जगताप, वृषाली खैरनार, पुजा जाधव, प्रतिभा खैरनार, अमृता जाधव, रुपाली जाधव, अंजली विसपुते, विद्या पवार, वर्षा कापडणीस, वैशाली पगार, अर्चना पाटील, रोशनी पाटील, माहेश्र्वरी कापडणीस, नेहा बागुल यांसह शिक्षकेतर कर्मचारी यासर्वांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.


