Breaking
महाराष्ट्र

सकल मराठा परिवार फाउंडेशन कडून उन्नत अभियान अंतर्गत वृक्षारोपण

न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

1 0 4 8 9 0

न्यायभूमी 

नाशिक दि. १२ जुलै मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

सकल मराठा परिवार फाउंडेशन आणि राम राज ग्लोबल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने,उन्नत नाशिक अभियान अंतर्गत राम राज ग्लोबल कॉलेज,हिंदुस्थान नगर,आडगाव (नाशिक) येथे वृक्षारोपणाचा भव्य उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमात नाशिकचे ‘ट्रीमॅन ‘म्हणून परिचितअसलेले आणि ज्यांना नुकताच महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार जाहीर केला आहे असे श्री.शेखर गायकवाड सर तसेच श्री.राम खुर्दळ सर यांनी वृक्षारोपण योग्य पद्धतीने कसे करावे.

कोणत्या प्रकारची झाडे लावावीत आणि त्यांचे संवर्धन कसे करावे याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.

सकल मराठा परिवाराचे श्री.खंडू आहेर सर यांनी महाराष्ट्रभर राबविण्यात येणाऱ्या आपल्या ग्रुपच्या विविध सामाजिक,शैक्षणिक व पर्यावरणपूरक उपक्रमांची माहिती देत समाजहितासाठी सर्वांनी एकत्र येऊन कार्य करण्याचे आवाहन केले.

यावेळी राम राज ग्लोबल कॉलेजचे श्री.रामकृष्ण घायाळ सर व सौ.हर्षदा घायाळ मॅडम यांनी महाविद्यालयाच्या विविध उपक्रमांची माहिती देऊन या अभियानासाठी आपला पूर्ण पाठिंबा व्यक्त केला.

या उपक्रमाची सुरवात वृक्ष पूजन करून व श्री शेखर गायकवाड सरांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे सकल मराठा परिवाराच्या वतीने तसेच राम राज ग्लोबल कॉलेज च्या वतीने सत्कार करून करण्यात आली.

सुमारे १५० हून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली.महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभागी होत वृक्ष लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

या प्रसंगी श्री शिवाजी धोंडगे(दारिमाता वृक्षमित्र परिवार )श्री शिंदे सर सकल मराठा परिवाराचे श्री.खंडू आहेर,प्रकाश बोराडे,डॉ.नितीन देशमुख,प्रविण देशमुख,संजय काळे,ॲड.गौरव मोहिते,स्नेहलताई काळे,संजय झारोळे,धनाजी आगळे,चेतन लोखंडे,कैलास देशमुख,दिलीप साबळे,प्रमोद सूर्यवंशी,संकेत कोरडे,मनोज साठे, स्वप्नील भोकरे,धोंडीराम रायते,भूषणऔटे,सनी शेवाळे तसेच,सकल मराठा परिवार आणि झाडांची भिशी ग्रुप चे अनेक सदस्य उपस्थित होते.

हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी राम राज ग्लोबल कॉलेजचे सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आणि व्यवस्थापनाचे विशेष सहकार्य लाभले.

सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम अतिशय आनंददायी वातावरणात संपन्न झाला.

 “हिरवेगार नाशिक घडविण्याचा आमचा संकल्प अविरत सुरू राहील.”

या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थी, शिक्षक,कॉलेज स्टाफ आणि सर्व मान्यवर उपस्थितीत होते.

2/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 0 4 8 9 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे