Breaking
महाराष्ट्र

एका संकल्पातून हरितक्रांती;रामकृष्ण घायाळ सर यांच्या पुढाकाराने विष्णुनगरने लिहिला हरित इतिहास

न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य सपादक दत्तात्रय दरेकर

1 0 4 8 9 0

न्यायभूमी 

 विंचूर (विष्णुनगर )दि.१३ जुलै मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

आज लावलेले झाड म्हणजे उद्याच्या पिढीसाठी दिलेला श्वास” या विचारातून रामकृष्ण मोतीराम घायाळ सर यांच्या संकल्पनेतून विष्णुनगरमध्ये हरितक्रांतीची ऐतिहासिक सुरुवात झाली.

पर्यावरण संवर्धन,सामाजिक बांधिलकी आणि गावाच्या सर्वांगीण विकासाचा संदेश देणारा भव्य वृक्षारोपण सोहळा माननीय विधान परिषद आमदार गोकुळ गीते यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.

यावेळी प्रवीण कदम (कृषी उत्पन्न बाजार समिती, लासलगाव),शिवा पाटील सुराशे (माजी सभापती, निफाड पंचायत समिती),सजय शेवाळे (माजी सदस्य, निफाड पंचायत समिती), गोपीनाथ ठुबे (माजी सरपंच,हनुमाननगर), अभिजित महाराज डुकरे,माधव जगताप, ज्ञानेश्वर धारराव (निफाड पंचायत समिती कर्मचारी), भागवत कानडे, सद्दाम शेख, करण वावधाने, सुनील शिंदे (ग्रामविकास अधिकारी, शिरवाडे), विजय गरुड (ग्रामविकास अधिकारी, विष्णुनगर) तसेच रामकृष्ण सुराशे (पोलीस पाटील, विष्णुनगर) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण संवर्धन,वृक्षांचे महत्त्व, आदर्श गावाची उभारणी, गावाचा सर्वांगीण विकास,युवकांची भूमिका आणि सामाजिक ऐक्य यावर मार्गदर्शनपर मनोगते व्यक्त केली.

 

कार्यक्रमात मोतीराम घायाळ, रामकृष्ण घायाळ सर, विठ्ठल घायाळ आणि ज्ञानेश्वर (माऊली) घायाळ यांच्या हस्ते माननीय आमदार गोकुळ गीते यांचा सन्मान करण्यात आला. तसेच काशिनाथ गावडे, दगू पाटील, सूर्यभान घायाळ, रामकृष्ण मवाळ, बाळासाहेब घायाळ, ज्ञानेश्वर देसले, एकनाथ जेऊघाले, रामेश्वर मोहन, कैलास पाटील, संतोष घायाळ, कमलाकर शिंदे, हेमंत घायाळ, ज्ञानेश्वर घायाळ आणि विशाल खापरे यांच्या हस्ते उपस्थित सर्व मान्यवरांचा भगवद्गीता भेट देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.

 

यावेळी मारुती मंदिरासमोर भव्य सभामंडप उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी माननीय आमदार गोकुळ गीते यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. हे निवेदन देव मारुती देवस्थान ट्रस्टतर्फे काशिनाथ गावडे, ज्ञानेश्वर देसले आणि सूर्यभान घायाळ यांनी सादर केले.

निवेदन स्वीकारल्यानंतर आमदार गोकुळ गीते यांनी, “मारुती मंदिरासमोरील सभामंडप मी करून देणार. हा माझा शब्द आहे आणि मी दिलेला शब्द कधीही वाया जात नाही,” अशी ठाम ग्वाही दिली. त्यांच्या या घोषणेनंतर उपस्थित ग्रामस्थांनी टाळ्यांच्या कडकडाटात जल्लोष करत आनंद व्यक्त केला.

 

पर्यावरण संवर्धनाच्या या उपक्रमाला अनेक दानशूर व्यक्तींनी मोलाची साथ दिली. सोनियाताई होळकर यांनी २०० आंब्याची झाडे, डॉ. आवारे यांनी ५१ नारळाची झाडे, तर जयदत्त होळकर यांनी ५१ चिकूची झाडे भेट देऊन या हरित मोहिमेला बळ दिले.

 

या कार्यक्रमास सखाराम जेऊघाले, भागवत देसले, आनंदा देसले, भिका शिंदे, भास्कर भडांगे, भाऊसाहेब घायाळ, केदू खरे,रघुनाथ जेऊघाले, प्रकाश खरे,जगन्नाथ घायाळ, विष्णू मवाळ, पवन वाकचौरे, गोटीराम घायाळ, तुकाराम देसले, सोपान मुरकुटे,आनंदा राजोळे, कैलास जेऊघाले, दत्तू घायाळ, पोपट मुरकुटे, हरिभाऊ पाटील, अर्जुन घायाळ, अनिल देसले, गणेश भडांगे, किरण घायाळ, रामकृष्ण वाकचौरे, संतोष देसले, दिलीप जेऊघाले, संदीप शेटे, उल्हास पाटील, पवन घायाळ, मंगेश घायाळ, महिंद्रा घायाळ, ऋषिकेश घायाळ, कार्तिक शेटे, धनंजय घायाळ, संदीप घायाळ, नितीन घायाळ, नंदू भडांगे, मोहन वाकचौरे, राहुल खापरे, दत्तू संधान, गणेश जेऊघाले, विश्वनाथ घायाळ, कृष्णा घायाळ, संदीप मुरकुटे, शांताराम कोटकर, रामा शिंदे, दिलीप संधान, संतोष मुरकुटे, संजय जेऊघाले, सागर हागवणे, सागर जेऊघाले, अनिल घायाळ, माऊली जेऊघाले, मनोज जेऊघाले, रवी गावडे, योगेश घायाळ, ओमकार देसले, पोपट हागोटे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ, महिला व युवक उपस्थित होते. वृक्षारोपणाबरोबरच प्रत्येक झाडाचे संगोपन करण्याचा निर्धारही ग्रामस्थांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक आहेर सर यांनी प्रभावीपणे केले.

घायाळ परिवाराने सामाजिक कार्याची जपलेली परंपरा या उपक्रमातून पुन्हा एकदा सिद्ध केली. समाजहित,पर्यावरण संवर्धन आणि गावाच्या विकासासाठी सातत्याने पुढाकार घेणाऱ्या या परिवाराच्या संकल्पाला आज संपूर्ण गावाची साथ लाभली.

ही केवळ वृक्षारोपणाची मोहीम नसून,भावी पिढ्यांसाठी हिरवेगार,समृद्ध आणि प्रदूषणमुक्त विष्णुनगर घडविण्याचा लोकसहभागातून उभा राहिलेला संकल्प आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 0 4 8 9 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे