लासलगाव येथे वटसावित्री पौर्णिमा साजरी
न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी
लासलगाव दि.२९ जून कैलास उपाध्ये जिल्हा प्रतिनिधी
लासलगाव येथील बाबा अमरनाथ मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे महिलांचा वट सावित्री पूजन सोहळा अतिशय थाटामाटात साजरा केला जातो.
वटपौर्णिमेला (वट सावित्री) विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी वटवृक्षाची पूजा करतात. सावित्रीने यमराजाकडून आपल्या पतीचे (सत्यवानाचे) प्राण परत आणले.
अशी या सणामागील मुख्य पौराणिक कथा आहे. या दिवशी स्त्रिया उपवास करून झाडाला सूत गुंडाळतात.महत्त्वाचे साजरी करण्याची तारीख: वटपौर्णिमा २९ जून रोजी साजरी करण्यात येत आहे.
पूजेचे महत्त्व: या दिवशी वडाच्या मुळाशी ब्रह्मा, मध्यभागी विष्णू आणि अग्रभागी शिव वास करतात,अशी मान्यता आहे.
पूजेचे साहित्य: पूजेसाठी हळद-कुंकू, सत्यवान-सावित्रीची मूर्ती, फळे (विशेषतः आंबे),फुले, कलश,पंचामृत आणि पांढरा धागा (सूत) आवश्यक असतो.पूजेचा शुभ मुहूर्त आणि वेळ:सकाळी पूजा करणे सर्वाधिक उत्तम मानले जाते.


