नाशिकच्या तपोवनात अवतरली’अयोध्या’; ७१ फूट भव्य श्रीराम मूर्तीसमोर काशीच्या धर्तीवर महाआरती!
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी
नाशिक दि.०८ मार्च मुख्य संपादक अभय पाटील
नाशिकच्या ऐतिहासिक तपोवन परिसरात प्रभू श्रीरामाची महाराष्ट्रातील सर्वात उंच,७१ फुटी भव्य प्रतिमा (मूर्ती) श्री राम कपिला संगम आरती समिती ट्रस्ट तपोवन पंचवटी,नाशिक. यांच्या संयुक्त विद्यमाने साकारण्यात आली असून,सध्या हे स्थान भाविकांच्या श्रद्धेचे मुख्य केंद्र बनले आहे.
विशेष म्हणजे, दररोज सायंकाळी या ठिकाणी उत्तर प्रदेशातील काशीच्या धर्तीवर अत्यंत मंगलमय वातावरणात महाआरती संपन्न होत आहे.
*ठळक वैशिष्ट्ये:
भव्य मूर्ती: महाराष्ट्रातील प्रभू श्रीरामाची ही सर्वात उंच (७१ फूट) मूर्ती असून तपोवनाच्या वैभवात यामुळे मोठी भर पडली आहे.
*नयनरम्य महाआरती:
रोज सायंकाळी ६:३० वाजता प्रभू श्रीराम आणि श्री गंगा मातेची महाआरती केली जाते.काशी येथील परंपरेप्रमाणेच येथे पुजारी आणि सपत्नीक जोडप्यांच्या हस्ते विधीवत पूजन केले जाते.
श्रीराम नवमीचा भव्य उत्सव:येत्या श्रीराम नवमीला आयोजकांकडून दोन दिवसीय भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यात मोठ्या प्रमाणावर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
मान्यवरांचा सन्मान :
नुकत्याच झालेल्या महाआरती प्रसंगी पत्रकार सुनील क्षिरसागर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहून यांनी आरतीचा लाभ घेतला. यावेळी आयोजकांच्या वतीने सर्व मान्यवरांना प्रभू श्रीरामाचा मानाचा ‘शेला’ घालुन विशेष सन्मान करण्यात आला.
या उपक्रमामुळे नाशिकमध्ये पुन्हा एकदा भक्तीचा मळा फुलला असून, श्रीराम नवमीच्या सोहळ्यासाठी नाशिककर उत्सुक आहेत. यावेळी
श्री राम कपिला संगम आरती समिती ट्रस्ट तपोवन पंचवटी,नाशिक.अध्यक्ष महंत डॉ श्री भक्तीचरन महाराज, उपाध्यक्ष दीपक बैरागी,कार्याध्यक्ष भगवंत कोठुळे,समिती प्रमुख नागेश चव्हाण,रोहित कोठुळे,योगेश बर्वे, निशिकांत पगारे,अश्विन पेखले,महंत बैजनाथ महाराज.
आयोजक:–श्रीराम कपिला आरती संगम समिती



