नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात ग्राहक पंचायत महाराष्ट्र्र व विविध ग्राहक संघटनांच्या उपस्थितीत जागतिक ग्राहक दिन साजरा
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
नाशिक दि २८ मार्च
दिनांक २७ मार्च २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता जिल्हाधिकारी नाशिक यांचे नियोजन सभागृहात ” १५ मार्च जागतिक ग्राहक दिन २०२५ चे आयोजन करण्यात आले.
अध्यक्ष मा.बाबासाहेब पारधे सर अपर जिल्हाधिकारी नाशिक,नाशिक ग्राहक तक्रार आयोगाच्या मा.अध्यक्षा सौ.मंदाकिनी भोसले मॅडम,तसेच आयोगाच्या सदस्य सौ.प्रेरणा महाजन,सौ.कविता चव्हाण मॅडम.कार्यक्रम द्वीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
प्रास्ताविक मा.श्री.कैलास पवार सर जिल्हापुरवठा अधिकारी नाशिक यांनी केले.कार्यक्रमास नाशिक मधील विविध ग्राहक संघटनांन चे मान्यवर पदाधिकारी,जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य, जिल्हा आयोगाने नियुक्त केलेले ” मध्यस्थ ” यांना निमंत्रित करण्यात आले.
त्यात ग्राहक पंचायत महाराष्ट्र नाशिक जिल्ह्याचे सर्वश्री.सुधीर काटकर जिल्हाध्यक्ष, दत्ता शेळके जिल्हा संघटक,डॉ.राजेंद्र बागुल जिल्हा सह संघटक,सुरेश धारणकर जिल्हा सचिव,प्रकाश जोशी महानगर नाशिक,अध्यक्ष.संदीप नगरकर महानगर नाशिक संघटक.यांना जिल्हापुरवठा अधिकारी नाशिक यांनी विशेष निमंत्रण दिले.
कार्यक्रमात श्री.दत्ता शेळके जिल्हासंघटक तथा जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य ग्राहक यांनी आपल्या मनोगतात कार्यक्रमाची थीम “शाश्वत जीवनशैली “या विषयावर पर्यावरणाचा समतोल राखावा,पर्यावरणाचे संरक्षण आणि जागतिक ग्राहक दिनाचे महत्व,फसव्या जाहिराती.अनावश्यक खरेदी टाळावी या बाबद उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास.मा.महेश चौधरी सर,सह आयुक्त अन्न व औषध प्रशासन नाशिक.मा.विनोद धनववाड सर सह आयुक्त अन्न व औषध प्रशासन नाशिक.मा.अ.श.गिरणारे सर उप नियंत्रक वैधमापन शास्त्र मेरी नाशिक.हे मान्यवर उपस्थित राहून त्यांनी मार्गदर्शन केले.



