Breaking
आरोग्य व शिक्षण

निफाड तालुकास्तरीय विज्ञान मेळावा उत्साहात संपन्न

न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

1 1 8 3 0 5

न्यायभूमी 

निफाड दि.१३ ऑगस्ट

    तालुकास्तरीय अखिल भारतीय विज्ञान मेळावा कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, विंचूर येथे विदयालयाचे उपमुख्याध्यापक श्री. वाबळे सर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय श्री.नवनाथजी सुडके साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत* पार पडला.

विज्ञान मेळाव्यात यावर्षी 23 माध्यमिक शाळांनी सहभाग घेतला.यास्पर्धेत 1) कुमारी संस्कृती नंदू बोडके , आदर्श माध्यमिक विद्यालय, पिंपळगाव निपाणी (प्रथम क्रमांक) , 2) कु. कल्याणी अंबादास पानसरे, डी. आर. बी. विद्यालय, देवगाव ( व्दितीय क्रमांक), 3) कुमारी पूर्वा संजय चांदे, जिजामाता कन्या विद्यालय, लासलगाव (तृतीय क्रमांक ) तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक:- कु. वेदिका दत्तात्रय देशमुख, गीताई कन्या विद्यालय भाऊसाहेब नगर, उत्तेजनार्थ पारितोषिक:- आयुष निलेश कुलकर्णी, वैनतेय विद्यालय, निफाड.

         स्पर्धेचे परीक्षण कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लासलगावचे प्राध्यापक डॉक्टर श्री. निकम सर, श्री खताळ सर – जनता विद्यालय,मुखेड तसेच श्री पानगव्हाणे व्ही.बी.सर, विस्डम इंटरनॅशनल स्कूल अँड अचिव्हर्स ज्युनियर कॉलेज, निफाड यांनी केले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. ठाकरे सर यांनी केले.

माननीय विस्तार अधिकारी नवनाथजी सुडके साहेबांनी मोलाचे मार्गदर्शन केले, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे उपप्राचार्य श्री वाबळे सर,परीक्षक डॉ.निकम सर यांनी मनोगत व्यक्त केले.

सूत्रसंचालन कर्मवीर भाऊराव पाटील जुनिअर कॉलेजच्या प्राध्यापिका श्रीमती गायकवाड मॅडम यांनी केले.

आभार प्रदर्शन विज्ञान अध्यापक संघाचे उपाध्यक्ष महावीर विद्यालय लासलगावचे उपशिक्षक श्री मुसळे सर यांनी केले.

सर्व विजेत्या स्पर्धकांचा प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. प्रत्येक सहभागी स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.

 *सर्व विजेत्यांचे तसेच सहभागी स्पर्धक आणि मार्गदर्शक शिक्षकांचे* 

 पंचायत समिती (शिक्षण) निफाडचे *गटशिक्षणाधिकारी माननीय श्री. विलासजी साळी साहेब* , रयत शिक्षण संस्था साताराचे *मॅनेजिंग कौन्सिल सदस्य श्री. राजेंद्र चांदे सर* आणि 

रयत शिक्षण संस्था,समन्वय समितीचे मुख्याध्यापक प्रतिनिधी श्री.नंदकुमार देवढे सर तसेच निफाड तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष श्री.भोसले सर यांनी अभिनंदन केले.

      याप्रसंगी विज्ञान मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी विज्ञान अध्यापक संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

3/5 - (3 votes)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 1 8 3 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे