Breaking
महाराष्ट्र

देवगाव मध्ये बिबट्या जेरबंद ठार मारण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा रास्ता रोको

न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 8 9 9 9 4

न्यायभूमी 

देवगाव दि.१३ नोव्हेंबर / अजिज काद्री

 निफाड तालुकाच्या पूर्व भागात आठवड्यांपासून दहशत माजवणारा बिबट्या अखेर काल पहाटेच्या सुमारास देवगाव परिसरात वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला.

देवगाव फाटा ते नैताळे रस्ता लगत असलेल्या गट नंबर ३८५/अ मधील शेतकरी शरद कृष्णराव जोशी यांच्या मळ्यात लावलेल्या पिंजऱ्यात हा बिबट्या सापडला.

बिबट्या जेरबंद झाल्याची बातमी कळताच त्याला पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली. दरम्यान,एक बिबट्या जेरबंद झाला असला तरी देवगाव आणि वाकद परिसरात अजूनही पाच ते सहा बिबटे असल्याचा ग्रामस्थांना संशय आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून या भागात बिबट्याचे दर्शन वारंवार होत असल्याने शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण कायम आहे.

सध्या पाऊस खूप झाल्यामुळे शेतात पीक उभे आहे.

मात्र बिबट्याच्या भीतीने शेतकरी व शेतमजूर शेतात काम करण्यास जाण्यास तयार नाहीत,या परिसरात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ही भीती लक्षात घेऊन संतप्त ग्रामस्थांनी अधिक तीव्र भूमिका घेतली.

या नरभक्षक बिबट्याला ठार मारावे, अन्यथा तो पुन्हा गावकऱ्यांच्या जीवाला धोका ठरू शकतो, या मागणीसाठी ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त करत तीव्र रास्ता रोको आंदोलन छेडले होते.

बुधवारी (दि. १२/११/२०२५) झालेल्या या आंदोलनादरम्यान नागरिकांनी पिंजऱ्यात जेरबंद बिबट्यासह पिंजरा अडवून ठेवण्यात आले होते.

माजी जि.प.सदस्य अमृता पवार,सतीश बोचरे, धनंजय जोशी,लहानु मेमाने,मनोहर बोचरे, भागवतबोचरे,राजेंद्र मेमाणे यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी वनविभागाचे सहाय्यक वन संरक्षक शिवाजी सहाने,वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल घुगे व सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक मोहन पाटील,पोलीस हवालदार औदुंबर मुरडणर,संदीप शिंदे व पोलिसांना घेराव घालून वन विभागाचा पिंजरा देखील अडवून जोपर्यंत बिबट्या ठार मारत नाही तोपर्यंत एकही विद्यार्थी शाळेत जाणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी व शालेय विद्यार्थ्यांनी घेतला. यावेळी वन विभागाचे अधिकारी पोलीस व आंदोलकांची संघर्ष ही उडाला.

परंतु आंदोलकांनी अतिशय आक्रमक पवित्रा घेतल्याने वनविभागाने नरभक्षक बिबट्यास ठार मारण्याची परवानगी मिळण्यासाठी वरिष्ठांकडे पत्रव्यवहार केला व देवगाव,रुई,देवगाव फाटा, वाकद परिसरात बिबट्या कडून जीवितहानी, वित्तहानी झाल्यास त्यास वनविभाग जबाबदार राहील असे पत्र घेण्यात आले.

संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास बिबट्याचा पिंजरा विभागाला सोपविण्यात आला.

वन विभागाच्या वतीने रेस्क्यू टीम दाखल झाली असून ड्रोन च्या साह्याने परिसर पिंजून काढण्यात येत आहे परिसरात ठिकठिकाणी चार पिंजरे लावण्यात आले आहे.

आंदोलनात जयेश लोहारकर,सचिन बोचरे, संतोष लोहारकर,ज्ञानेश्वर आरोटे,रेवणसिद्ध लोहारकर,बापू बोचरे,दीपक आढागळे,आदीसह ग्रामस्थ विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलीस पाटील सुनील बोचरे,लासलगाव पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी यावेळी बंदोबस्त ठेवला.

यावेळी पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

3/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे