पांढुर्ली आरोग्य केंद्रातील प्रयोजिनी लोहकरे यांना प्रथम क्रमांक पुरस्काराने सन्मानित
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
सिन्नर दि २५ ऑगस्ट प्रतिनिधी:-
पांढुर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी प्रयोजिनी धनराज लोहकरे यांना उत्कृष्ट कामाबद्दल नाशिक विभागातून प्रथम क्रमांक देऊन गौरविण्यात आले.
सार्वजनिक आरोग्य विभागातील राष्ट्रीय कीटकजन्य व जलजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सन २०२३-२४ या वर्षांमध्ये उत्कृष्ट कामाबद्दल कर्मचाऱ्यांचा नाशिक येथे गौरव करण्यात आला.
त्यामध्ये पांढुर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी प्रयोजिनी धनराज लोहकरे यांना नाशिक विभागातून प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. कपिल आहेर व हिवताप सहाय्यक संचालक डॉ. विवेक खतगावकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमप्रसंगी डॉ. चित्ते, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सुनिता पिवळतकर आदी उपस्थित
होते. श्रीमती लोहकरे यांनी प्रयोगशाळेतील विविध तपासण्यामार्फत उत्तम रुग्णसेवा देत आहे .तसेच त्यांचा राष्ट्रीय कार्यक्रमातील सकीय सहभाग व विविध उपक्रमातील नाविन्यपूर्ण काम याची दखल घेऊन आरोग्य विभागामार्फत प्रतिष्ठेचा विभागीय स्तरीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले.
हा पुरस्कार मिळालयाबद्दल पांढुर्ली आरोग्य केंद्राच्या वतीने सत्कार करण्यात आला.
लोहकरे यांना मिळालेल्या यशामध्ये त्यांच्या घरातील सर्व सदस्य, पती योगेश चारभे अधिक्षक आदिवासी विकास विभाग, पांढुर्ली आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.लहू पाटील डॉ प्राची गावित ,गणेश वाजे यांच्यासह इतर सर्वच कर्मचाऱ्यांचे खूप मोठे योगदान आहे.
या सर्वांचे वेळोवेळी लाभ मिळालेले सहकार्य व मार्गदर्शन यामुळेच हे शक्य झाल्याचे श्रीम.लोहकरे यांनी सांगितले.
सूत्रसंचालन रूपाली सूर्यवंशी यांनी केले.