न्यायभूमी न्यूज
नाशिक दि २१ ऑगस्ट दत्तात्रय दरेकर
नाशिक एमजी रोड येथील “फोटोग्राफर्स कट्टा” या ठिकाणी नाशिक मधील जेष्ठ व नवीन फोटोग्राफर सोबत व्यवसायिक छायाचित्रकार उपस्थित होते.
या प्रसंगी नाशिक मधील प्रसिद्ध व जेष्ठ छायाचित्रकार शिरिष हिंगणे व नाशिक फोटोग्राफर्स असोसिएशन चे अध्यक्ष संजय जगताप, सेक्रेटरी नंदू विसपुते यांच्या हस्ते कॅमेरा पूजन करून उपस्थित छायाचित्रकार बंधुना फुले देऊन जागतिक छायाचित्रण दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
अध्यक्ष- संजय जगताप यांनी आजचा आपला हा दिवस किती आनंदाचा आहे . व आपण हा दिवस का साजरा करतो…..
आपल्या फोटोग्राफी क्षेत्रातील आपला हा दिवस म्हणजे वाढदिवस आहे.
जागतिक छायाचित्रण दिन दरवर्षी १९ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. १९ व्या शतकातील १८३९ साली फ्रान्स सरकारने छायाचित्रणाचे सर्वप्रथम पेटंट जारी केले.
या दिवशी लुईस डॅग्युएर यांनी डॅग्युएरोटाइप पद्धतीची जगाला ओळख करून दिली, ज्यामुळे छायाचित्रणाचा पाया घातला गेला. या दिवसाचे उद्दिष्ट छायाचित्रकारांना त्यांच्या कार्यासाठी प्रेरणा देणे आणि छायाचित्रणाची कला जगभरात साजरी करणे आहे. या बद्दल माहिती दिली.
या जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त २५ ऑगस्ट रोजी मुंबई येथे प्रसिद्ध लेखिका सामाजिक उद्योजिका आंतरराष्ट्रीय वक्त्या मा अल्पा शहा व मुंबई येथील प्रमुख पाहुणे छायाचित्रकार मा. अतुल जोशी.
अतुल व्हिडिओचे व
AMV न्यूज चॅनेलचे संचालक
MPA फोटोग्राफर असोसिएशन मुंबई चे विश्वस्त.
Aiptia चे सदस्य आणि सहकारी PSI चे सदस्य. यांचेही उपस्थित छायाचित्रकाराना “आपण आपला बिजनेस कसा वाढवायचा”. आणि आपण आपले स्वप्न आणि ध्येय गुंतवणूकीच्या माध्यमातून कसे साध्य करू शकतो.
या विषयावर मार्गदर्शन व सल्ला आणि चर्चा आयोजित करण्यात आली आहे यात एकुण २०० फोटोग्राफर्स व महिलांनी सहभाग नोंदविला आहे याचा आनंद वाटतो. हा सर्व कार्यक्रम नि: शुल्क असुन तो सकाळी ११ ते दुपारी ३ वेळेत
मार्गदर्शन सोबत स्नेह भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
तसेच जवळच असलेल्या देशदूत वृत्तपत्र कार्यालयात सर्व सन्माननीय छायाचित्रकार कमिटी मेंबर्स यांना निमंत्रित करून चहापाणासाठी बोलवण्यात आले होते संपादक वैशाली बालाजीवाले यांनी फोटोग्राफर एक आर्टिस्ट असून हजार शब्द देखील एका छायाचित्रासाठी कमी पडतील त्याचप्रमाणे निगेटिव्ह ते डिजिटल पर्यंतचा प्रवास करत तुम्ही आज या क्षेत्रात कार्यरत आहात याचा आनंद व अभिमान वाटतो देशदूत व छायाचित्रकार हे नाते आजचे नसुन खुप पुर्वीपासूनचे आहे.
नाशिक फोटोग्राफर्स असोसिएशनला काही मदत लागल्यास देशदूत नेहमीच त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे असेल असे गौरवद्वार काढले.
यावेळी सेक्रेटरी- नंदू विसपुते, खजिनदार- किरण मुर्तडक, सल्लागार- प्रताप पाटील, प्रशांत तांबट, कमिटी मेंबर – राजू नाकील, सौरभ अमृतकर, तुकाराम गांगुर्डे, सुनील जगताप, रविंद्र गवारे, संदिप भालेराव, विलास आहिरे तसेच छायाचित्रकार नंदू खांबेकर,किरण निकुंभ, आशिष दिवेकर, उदय रांजणगावकर , राजा पाटेकर, संजय गाडे, विनोद पाटील, प्रविण गिते, नाईस डिजिटल चे संजय चौधरी फोटो लाईटचे संतोष लाले , आदि छायाचित्रकार यावेळी उपस्थित होते.