Breaking
गुन्हेगारी

युरिया काळाबाजार प्रकरण; माजी जिल्हा परिषद सदस्यासह दोघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी

न्यायभूमी दि.०३ ऑगस्ट जिल्हा प्रतिनिधी कैलास उपाध्ये

1 1 5 6 5 8

विष्णुनगर येथे शासनाच्या अनुदानित युरिया खताचा कथित काळाबाजार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर दगू पवार व सागर किशोर गरड या दोन्ही आरोपींना रविवारी लासलगाव पोलिसांनी निफाड येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस.एच. गहेरवार यांच्या न्यायालयात हजर केले.

सुनावणीनंतर न्यायालयाने दोघांनाही पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

लासलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विष्णुनगर येथे शासनाकडून शेतकऱ्यांना अनुदानित दरात उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या युरिया खताचा साठा काळ्या बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार १ ऑगस्ट रोजी सायंकाळी पोलिसांनी छापा टाकून टाटा कंपनीचा ट्रक व युरियाच्या खतासह एकूण ८८ लाख ३६ हजार ६२४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता.

या प्रकरणी ज्ञानेश्वर दगू पवार (रा. इंदिरानगर, विंचूर) व सागर किशोर गरड (रा. सुभाषनगर रोड,विंचूर) यांच्याविरुद्ध २ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २३६/२०२६ अन्वये अत्यावश्यक वस्तू अधिनियम,१९५५ तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सरकारी पक्षातर्फे ॲड. सजगुरे यांनी बाजू मांडली.

पोलीस कोठडीदरम्यान युरिया खताचा पुरवठा, साठवणूक, वितरण व विक्रीचे जाळे, तसेच या प्रकरणात अन्य व्यक्तींचा सहभाग आहे का, याबाबत लासलगाव पोलीस सखोल तपास करणार आहेत.

या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंके करीत आहेत.

3.3/5 - (3 votes)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 1 5 6 5 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे