“श्री दत्त जयंती व गीता जयंती व अखंड हरिनाम सप्ताह संपन्न”
न्यायभूमी न्यूज संस्थापक पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी
लासलगाव दि.०६ निशिकांत पानसरे

श्रीराम मंदिर ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ लासलगाव यांच्या वतीने शुक्रवार दिनांक २८/११/२५ते शुक्रवार दिनांक५/१२/२५ दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता.
यामध्ये दररोज सकाळी ९ ते११ गाथा भजन, दुपारी ३ ते४ भजन, ४:३० ते ५:३० हरिपाठ सायंकाळी ६ ते ८ किर्तन आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी नामांकित कीर्तनकार परिसरातील भजनी मंडळी व टाळकरी मंडळी यांची उत्कृष्ट साथ लाभली होती.

या अखंड हरिनाम सप्ताह साठी लासलगाव व परिसरातील भाविक बंधू भगिनींनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला.
तसेच दररोज कीर्तनाचा कार्यक्रम संपल्यावर भाविकांसाठी प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
लासलगाव व परिसरातील भाविक दानशूर व्यक्तीने महाप्रसाद म्हणून अन्नदान केले. अखंडपणे चाललेल्या महाप्रसादाचा आस्वाद परिसरातील व गावातील भाविक बंधू-भगिनी मोठ्या आनंदाने घेतला.
या अखंड चाललेल्या हरिनाम सप्ताहाची सांगता शुक्रवार दिनांक ५/१२/२५ रोजी सकाळी पालखीची मिरवणूक काढण्यात आली व ह भ प केशव महाराज हगवणे यांच्या काल्याच्या कीर्तनानेअखंड चाललेल्या हरिनाम सप्ताहाचे सांगता झाली.
अखंड हरिनाम सप्ताह यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्रीराम मंदिर ट्रस्ट लासलगावचे अध्यक्ष श्री अशोक नाना होळकर,डॉक्टर कैलास पाटील,डॉक्टर युवराज पाटील,सुरेश वडनेरे, विष्णू निकम,कवी प्रकाश होळकर,नानासाहेब पाटील,भरत पाटील तसेच लासलगाव ज्येष्ठ नागरिक,संघाचे सदस्य श्री सी एस पाटील,एस आर शिंदे,अरविंद होळकर,एकनाथ थोरात ,हिरामण घोडे,भरत वडनेरे,अग्निहोत्री,विवेक तेल्हारकर,जितू गुरव,राजाराम बोराडे तसेच श्री दत्त भक्त मंडळ लासलगाव व परिसरातील भाविक बंद भगिनींनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी संपन्न केला.



