Breaking
महाराष्ट्र

लासलगाव सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांची पत्रकार सुनील क्षिरसागर यांच्या घरी गौरी-गणपती दर्शनासाठी सदिच्छा भेट

न्यायभूमी न्यूज

0 9 0 0 0 1

न्यायभूमी न्यूज

विचूर दि ०२ सप्टेंबर अभय पाटील 

विंचूर शहरातील पत्रकार सुनील क्षिरसागर यांच्या घरी सुरु असलेल्या गौरी-गणपती उत्सवाच्या निमित्ताने लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांनी सदिच्छा भेट दिली.

यावेळी त्यांनी गौरी (महालक्ष्मी) व गणरायाचे दर्शन घेत क्षिरसागर कुटुंबीयांना उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

   या प्रसंगी एपीआय शिंदे यांनी नागरिकांनी गणेशोत्सव शांततेत,उत्साहात व सामाजिक ऐक्यासह साजरा करावा,असे आवाहन केले. तसेच पर्यावरणपूरक पद्धतीने उत्सव पार पाडण्यावर त्यांनी विशेष भर दिला.

  पत्रकार सुनील क्षिरसागर यांनी पोलीस प्रशासन सतत समाजकार्याबरोबरच नागरिकांच्या सुख-दुःखातही सहभागी होत असल्याचे सांगून आभार मानले.

     गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर झालेली ही सदिच्छा भेट स्नेह व भक्तीमय वातावरणात पार पडली. 

यावेळी शिंदे साहेबांसोबत न्यायभूमी चे मुख्य संपादक अभय पाटील,डोंगरे दादा,सागर आरोटे,नाना गाडे उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे