ताहाराबाद विद्यालयातील शिक्षकाचा अभिनव उपक्रम
वडिलांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने केली शेकडो विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत
न्यायभूमी न्यूज
ताहाराबाद दि ३१ जानेवारी
ताहाराबाद येथील मविप्र संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज,ताहाराबाद विद्यालयातील उपशिक्षक जितेंद्र बच्छाव यांनी आपले वडील कालकथित पॅंथर प्र. र. बच्छाव यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने कालकथित पॅंथर प्र. र.रबच्छाव सामाजिक संस्थेतर्फे ताहाराबाद विद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांना पॅड,वह्या व कंपासपेटी आदी शैक्षणिक साहित्याची मदत करून एक अभिनव उपक्रम राबविला.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष विलास बापू निकम हे होते.
कालकथित प्र. र.बच्छाव यांच्या पाचव्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने सदर साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी विचारमंचावर विद्यालयाचे प्राचार्य डी. ए. डावरे, उपमुख्याध्यापिका श्रीमती आर.आर सोनवणे, प्रभारी पर्यवेक्षक श्री एस.के निकम उपस्थित होते.
यावेळी जितेंद्र बच्छाव यांनी वडिलांच्या प्रत्येक स्मृतिदिनाच्या निमित्ताने गेल्या पाच वर्षापासून सामाजिक उपक्रम राबवित असून यापुढेही असे उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री डावरेसर यांनी बच्छावसर यांच्या उपक्रमाचे कौतुक करून इतरांनाही त्यांचा आदर्श घ्यावा असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास बापू निकम यांनी देखील सदर उपक्रमाची स्तुती केली.

सदर कार्यक्रमाचे आभार उपशिक्षक के. जी. अहिरे यांनी मानले.यांनी वेळी उपशिक्षक जे. एल. गावित,के. एम. मोरे,के. ए. बागुल,के. जी. अहिरे,के. बी. चव्हाण, श्रीमती पी.पी माटे,एस. बी. सोनवणे,श्रीमती एस. बी.रौंदळ, श्रीमती डी. आर. गावित,एस.आर. दळवी,राहुल संसारे, श्रीमती एस. यू. भामरे, सीमा पवार,एस.पी.देवरे, राहुल पगार, श्रीमती एस. व्ही. सूर्यवंशी,जयदीप मोरे,डी.व्ही. सोनवणे, एल.यु.साळवे, वाय. व्ही. पवार ,सुनील देवरे, सखाराम अहिरे, निलेश माळी,धनंजय वणीस, कुणाल देवरे,मंगेश पगारेमामा आदी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक सुजित देवरे यांनी केले.


