Breaking
महाराष्ट्र

लासलगाव येथे चर्मकार समाजाच्या वतीने संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती साजरी

न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 8 9 9 8 8

न्यायभूमी 

निफाड  दि.०३ फेब्रुवारी प्रतिनिधी रामभाऊ आवारे

लासलगाव येथील चर्मकार समाज मंडळाच्या वतीने सालाबादाप्रमाणे याही वर्षी रविवार, दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी श्रीराम मंदिरात संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

मन चंगा तो कठौती में गंगा’ हा संदेश देणाऱ्या संत रोहिदास महाराजांच्या जयंतीनिमित्त लासलगाव व पंचक्रोशीतील समाज बांधवांच्या वतीने श्रीराम मंदिर येथून गुरुद्वारा पर्यंत सकाळी ९:३० वाजता संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या पालखी पूजन करुन भव्य मिरवणुक संपन्न झाली.

पालखी सोहळ्यात भजनी मंडळाने टाळ मृदुंगांच्या निनादात व भजनाने अनोखी साद घातली होती.त्यानंतर ११:०० वा ह.भ.प. वासुदेवनंदगिरी महाराज (बहुरूपी महाराज) यांच्या आशीर्वादाने सकाळी १० वाजता ह.भ.प. निलेश महाराज पवार यांचे प्रवचन संपन्न झाले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाप्रसादाचे मानकरी भिकाजी पुंजाजी पगारे यांनी भूषविले , उपाध्यक्ष म्हणून गणेश उत्तमराव घोलप हे होते. पुढील वर्षाचे महाप्रसादाचे नारळ राजेंद्र वाघ यांना देण्यात आले.

प्रवचनाच्या कार्यक्रमानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.पालखी मिरवणुकीत व उत्सव सोहळ्यात पंचक्रोशीतील चर्मकार समाज सहपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवकांनी विशेष परिश्रम घेतले. स्वर्गीय अजित दादांना पसायदानाने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 8 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे