Breaking
महाराष्ट्र

विंचूर येथे १७ एप्रिल रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा’चे आयोजन

न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 9 1 5 0 3

न्यायभूमी 

विंचूर (नाशिक) दि.१७ एप्रिल ​सुनील क्षिरसागर

महसूल विभागाचे विविध धोरणात्मक निर्णय तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावण्यासाठी विंचूर येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’आयोजित करण्यात आले आहे.हे शिबीर शुक्रवार,दिनांक १७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता निसर्ग लॉन्स येथे पार पडणार आहे.

प्रमुख अतिथी व मार्गदर्शन

​या भव्य शिबिराचे उद्घाटन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना. छगन भुजबळ यांच्या हस्ते होणार असून,दिंडोरी लोकसभेचे खासदार मा.भास्कर मुरलीधर भगरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

​कार्यक्रमासाठी निफाडचे उपविभागीय अधिकारी मा.डॉ.शशिकांत मंगरुळे आणि तहसीलदार मा.विशाल नाईकवाडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे.

या शिबिराचे नेटके नियोजन मंडल अधिकारी संतोष डुंबरे व विंचूर महसूल मंडळातील सर्व तलाठी व कर्मचाऱ्यांनी केले आहे.

​एकाच छताखाली मिळणाऱ्या सेवा:

​या शिबिरात नागरिकांना विविध महसुली सेवांचा लाभ तातडीने घेता येणार आहे,त्यामध्ये प्रामुख्याने:

​७/१२ उतारा दुरुस्ती: भोगवटादार वर्ग-२ मधून वर्ग-१ मध्ये रूपांतरित जमिनींच्या ७/१२ चे वाटप व प्रलंबित नोंदी पूर्ण करणे.

​प्रमाणपत्र वाटप: विद्यार्थ्यांना लागणारे विविध दाखले व लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत प्रमाणपत्रांचे तात्काळ वाटप.

​शासकीय योजना: ‘घरकुल’ योजनेतील पात्र लाभार्थ्यांना पट्टे वाटप आणि ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते’ योजनेचे आदेश प्रदान करणे.

​अभिलेख दुरुस्ती: पोटखराबा जमिनीचे लागवडीलायक क्षेत्रात रूपांतर,प्रलंबित फेरफार विल्हेवाट आणि तक्रार निवारण.

​डिजिटल सेवा: ई-मोजणी, ॲग्रीस्टॅक आणि पी.एम. किसान संदर्भातील अडचणींचे निराकरण.

​सहभागी गावे व आवाहन

​या शिबिरात विंचूरसह हनुमाननगर, विष्णूनगर, सुभाषनगर, विठ्ठलवाडी,डोंगरगाव,धानोरे, नांदगाव,गोदेगाव,गोळेगाव,मरळगोई (बु.व खु.), धारणगाव (विर व खडक) आणि बोकडदरा या गावांतील नागरिकांनी सहभागी व्हावे.

​विंचूर महसूल मंडळातील सर्व सरपंच,पोलीस पाटील,ग्रामपंचायत पदाधिकारी,कृषी अधिकारी आणि नागरिकांनी या संधीचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा,असे आवाहन महसूल विभागातर्फे करण्यात आले आहे.

1/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 1 5 0 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे