Breaking
गुन्हेगारी

नासिक मध्ये खुनाचे सत्र सुरूच दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या सविस्तर वृत्त

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 8 9 9 9 5

न्यायभूमी न्यूज 

 नाशिक दि २० मार्च : डॉ स्वप्निल आहेर / रोशन गव्हाणे

नासिक शहरात खळबळजनक अशी घटना समोर आली आहे.नाशिक मधील उपनगर भागातील बोधले नगर जवळील आंबेडकर वाडी येथे 2 भावांवर कोयत्या सारख्या धारधार शस्त्राने झाल्याचे वृत्त हाती आले असून यामध्ये दोघे भाऊ मयत झाले असून राष्ट्रवादी अजितदादा गटाचे शहर उपाध्यक्ष उमेश उर्फ मन्ना जाधव आणि त्यांचे सख्खे भाऊ प्रशांत जाधव यांचा धारदार शस्त्राने वार करुन निर्घृण खून करण्यात आला आहे.

सतत होणाऱ्या खूणाच्या घटनेमुळे शहरातील नागरिक भयभीत झालेले त्यामुळे पुनश्च एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

गुन्हेगार लवकरात लवकर पकडा अशी परिसरातील नागरिक व नातेवाईक मागणी करत आहे या खूणाच्या तपासासाठी चार विशेष पथक रवाना करण्यात आले.

सदर विभागीय पोलीस पुढील तपास करत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे