Breaking
आरोग्य व शिक्षण

एस.एन.डी.अभियांत्रिकी महाविद्यालयात”ट्रान्सफॉर्मिंग आयडियाज इंटू सोल्यूशन्स : अ मल्टी डिसप्लीनरी रिसर्च “या एक दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 2 1 0 1

न्यायभूमी न्यूज 

येवला दि १५ में पुष्पा पाटील 

एस.एन.डी.अभियांत्रिकी महाविद्यालय आणि संशॊधन केंद्र बाभुळगांव ता.येवला येथे दिनांक 25 एप्रिल 2025  रोजी एक दिवसीय ट्रान्सफॉर्मिंग आयडियाज इंटू सोल्यूशन्स : अ मल्टी डिसप्लीनरी रिसर्च या विषयावर राष्ट्रीय परिषद यशस्वी पणे संपन्न झाली.

सदर एक दिवसीय परिषद मध्ये विविध महाविद्यालयातुन 146 हुन अधिक विद्यार्थी व प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला.

सदर एक दिवसीय परिषद मध्ये यंत्र अभियांत्रिकी मधील विविध महाविद्यालयातुन 146 हुन प्राध्यापक पदवीधारक ( डिग्री इंजिनियरिंग)  व पदवी त्तर (पोस्ट ग्राज्यूयट )विध्यार्थी यांनी सहभाग नोंदविला.

सदर परिषदे मध्ये मशीन डिझाइन , थर्मल इंजिनीयरिंग, हायवे इंजिनीयरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनीयरिंग , कॉम्प्युटर इंजिनीयरिंग तसेच मॅनेजमेंट अशा सर्व शाखांच्या विविध विषयांवर 146 उत्कृष्ठ शोधनिबंध सादर केले.

यावेळी बोलताना प्राचार्य डॉ डी. एम यादव यांनी सहभागी विद्यार्थी व प्राध्यापकांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी सांगितले की अभियंत्यांनी नाविन्यपूर्ण संशोधन करावे. प्रमुख पाहुणे डॉ प्रसाद बावीस्कर ( शैक्षणिक अधिष्ठाता ‘ एसएन जे बी इंजिनियरिंग कॉलेज चांदवड) यांनी सहभागी विद्यार्थ्यांना शोधनिबंधा विषयी माहिती दिली. तसेच आधुनिक तंत्रज्ञान, औद्योगिक क्षेत्राचा विकास याबद्दल माहिती सांगितली. तसेच महाविद्यालयाचे व्यवस्थापन व परिषदेच्या सभासद मंडळीचे आभार व्यक्त केले व सहभागी विद्यार्थ्यांना सादरीकरणासाठी शुभेच्छा दिल्या. 

 

 परिषदेचे कार्यवाहक सिव्हिल विभागप्रमुख डॉ उबेद अन्सारी,मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ हरजीत पवार ,कॉम्प्युटर विभागप्रमुख डॉ गिरीशा बोंबले इलेक्ट्रिकल विभागप्रमुख डॉ पवन टापरे शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. संदीप येवले रजिस्ट्रार प्रा. दत्तात्रय क्षीरसागर , एमबीए विभागप्रमुख प्रा. पी. एम दंडगव्हाळ, एमसीए विभागप्रमुख साठे प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ विद्या निकम , इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागप्रमुख डॉ प्रकाश रोकडे , मेकॅट्रॉनिक्स विभागप्रमुख डॉ हर्षल राणे इलेकट्रॉनिक्स, ऍण्ड कॉम्पुटर विभागप्रमुख प्रा. गणेश ढाके डॉ अजित भाने प्राध्यापक व विध्यार्थी उपस्थित होते. सदर परिषदेचे सूत्रसंचालन प्रा. रोहित पोटे यांनी केले. .

 

सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार श्री.नरेंद्रभाऊ दराडे, आमदार श्री. किशोरभाऊ दराडे, सचिव श्री.लक्ष्मणभाऊ दराडे, सं व श्री.कुणालभाऊ दराडे यांनी अभिनंदनकेले. 

शोध निबंध सादर करणार्‍या सर्वांना संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार श्री.नरेंद्रभाऊ दराडे, आमदार श्री. किशोरभाऊ दराडे, सचिव श्री.लक्ष्मणभाऊ दराडे, संचालक श्री. रुपेश भाऊ दराडे व श्री.कुणालभाऊ दराडे यांनी शुभेच्छा दिल्या

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 2 1 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे