Breaking
आरोग्य व शिक्षण

सोमनाथ गिरी यांना कविवर्य कुसुमाग्रज शिक्षक सन्मान पुरस्कार जाहीर

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 0 0 0 1

न्यायभूमी न्यूज 

सिन्नर दि 24 फेब्रुवारी  अभय पाटील 

डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील उपशिक्षक सोमनाथ कुसुमबाई लक्ष्मण गिरी यांना कविवर्य कुसुमाग्रज शिक्षक सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे .
शैक्षणिक क्षेत्रात, मराठी भाषेबरोबर विविध कला,सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय देश हिताच्या संवर्धनासाठी आणि विद्यार्थी सर्वांगीण विकासासाठी राबवत असलेल्या उपक्रमाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार झाला आहे.

अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक तथा नाशिक जिल्हा मराठी अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश सलादे यांनी दिली आहे.


कविवर्य कुसुमाग्रज यांची जयंती व जागतिक मराठी भाषा गौरवदिनी म्हणजे गुरुवार दि.२७ फेब्रुवारी रोजी शिरवाडे वणी ता-निफाड येथे विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीनजी ठाकरे, तालुका संचालक कृष्णाजी भगत, संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉ. भास्करराव ढोके, कार्यालयीन अधीक्षक दत्तात्रय लोंढे, शालेय समितीचे अध्यक्ष नारायणशेठ वाजे ,उच्च माध्यमिक समितीचे अध्यक्ष विठ्ठल तात्या वामने,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सोमनाथ वारुंगसे, विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास वाजे ,पोलीस पाटील रामदास वारुंगसे ,केंद्रप्रमुख विजय निरगुडे, अरुणशेठ वारुंगसे,अशोक गवळी, शरद माळी आदींसह शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी कौतुक केले.

हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे