Breaking
गुन्हेगारी

विंचूर येथील पेट्रोल पंपावर पार्किंग केली असता ट्रेलर मधून 200 लिटर डिझेलची चोरी सविस्तर वृत्त

पेट्रोल पंप परिसरात बसवलेल्या सीसीटीव्ही फक्त नावालाच

0 9 2 0 9 2

न्यायभूमी न्यूज 

विंचूर -दि २२ मार्च मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

निफाड रस्त्यावरती असणाऱ्या किल्ले वाले पेट्रोल पंप येथे रात्रीच्या सुमारास शांताराम विश्वनाथ जेऊघाले यांचा हा ट्रेलर MH,o4.G.F.1715 हा ट्रेलर पार्किंग करण्यात आला होता.

मात्र रात्रीच्या सुमारास या ट्रेलर मधून 200 लिटर डिझेलची चोरी करण्यात आली असून या पेट्रोल पंप परिसरात चोरीच्या घटना वारंवार घडत असून या पेट्रोल पंप परिसरात बसवलेल्या सीसीटीव्ही फक्त नावालाच असून या सीसीटीव्ही कार्यान्वित नसल्याने अशा घटना वारंवार या ठिकाणी घडत आहे..!

या चोरीच्या घटनांनी ट्रक ड्रायव्हर अगदी मेटाकुटीस आले असून या चोरट्यांवर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने ट्रक ड्रायव्हर कडून चिंता व्यक्त केली जात असून या संबंधित प्रकारावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी.

तसेच पेट्रोल पंप व्यवस्थापनाने या ठिकाणी सीसीटीव्ही कार्यान्वित करून या डिझेल चोरणाऱ्यांचा बंदोबस्त करावा.

अशी मागणी रोजच्या वाहतूक करणाऱ्या ड्रायव्हर यांच्या कडून करण्यात येत आहे..!

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 2 0 9 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे