Breaking
कृषीवार्ता

शेतकऱ्यांसाठी ही काळी दिवाळी:–कृषीतज्ञ,काँग्रेस नेते सचिन होळकर

न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 8 9 9 8 5

न्यायभूमी 

लासलगाव दि.२२ ऑक्टोंबर निशिकांत पानसरे 

यावर्षीची दिवाळी ही शेतकऱ्यांसाठी काळी दिवाळी ठरली असून शेतकरी वर्ग प्रचंड अडचणीत आहे.नुकत्याच राज्यभर झालेल्या अवकाळी पावसामुळे पूर्णपणे शेती पिके आणि शेतजमीन उध्वस्त झाली आहे.अजूनही अनेक भागात पाऊस पडत आहे.

यामुळे काढणीला आलेल्या खरिपांच्या पिकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे.द्राक्ष बागांच्या काड्यांच्या परिपक्व न झाल्याने बागा फेल जाण्याचे प्रमाण खूप वाढले आहे.सरकारने शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत जाहीर केली.

मात्र अद्यापपर्यंत अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही ज्यांना मदत मिळाली त्यांना देखील अत्यंत तुटपुंजी रक्कम मिळाली आहे एकंदर सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहे.

शेतीपिकांच्या बाजारभावांचा विचार केल्यास सोयाबीन,मका,कांदे या सर्व पिकांचे दर हे खूप कमी आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल विक्री करणे देखील परवडणारे नाही.सोयाबीन आणि मक्याचा हमीभाव देखील शेतकऱ्यांना मिळत नाही.

त्यातच दिवाळी सण आल्याने पिकांच्या काढणीसाठी मजूर मिळत नाही मजुरांसाठी शेतकऱ्यांना वाढीव मजुरी द्यावी लागत आहे. एकंदर शेतकरी यावर्षी चौफेर संकटात सापडला आहे. सरकारने याचा गांभीर्याने विचार करून भरीव आर्थिक मदत शेतकऱ्यांना करणे आवश्यक आहे.

त्याचप्रमाणे सोयाबीन आणि मका आणि इतर पिकांचे बाजारभाव वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत,हमीभावापेक्षा कमी दराने विकलेल्या शेतमालाला तफावत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात अदा करण्यात यावी.

हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे अशा मागण्या नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस,कृषीतज्ञ,सचिन आत्माराम होळकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 8 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे