सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या सविस्तर वृत्त
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
येवला दि १७ जानेवारी डॉ.स्वप्निल आहेर
नांदगाव तालुक्यातील भवरी येथील गौतमी त्रिभुवन या विवाहितेने सासरच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आपले जीवन संपविले आहे या यासंदर्भात नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, मयत गौतमी हिच्या आई लक्ष्मीबाई रमेश बागुल राहणार भवरी तालुका नांदगाव यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार संशयित आरोपी गौतम कान्हो त्रिभुवन गौतमीचा नवरा , हा पत्नी गौतमी त्रिभुवन हिच्यावर वारंवार चरित्राचा संशय घेत असल्याने अखेर या जाचाला कंटाळून गौतमी हिने दिनांक 15 जानेवारी रोजी दुपारी दोन च्या सुमारास राहते घरी ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
ही घटना भवरी तालुका नांदगाव येथे मुलीच्या माहेरी घडली.
मयत राणी हिचा पती गौतम त्रिभुवन हा वारंवार पत्नी वरती चारित्र्याचा संशय घेत असल्याने तसेच मारहाण करत असल्याने या जाचाला कंटाळून तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची फिर्याद तिच्या नातेवाईकांनी नांदगाव पोलिसात दिली आहे.
घटनेचा तपास पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे व पोलीस हवालदार भास्कर बस्ते हे करीत आहे.



