योग हीच निरोगी जीवनाची खरी गुरूकिल्ली…न्या.डॉ.विक्रम अंबादास आव्हाड
न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी
मेढा दि.२१ जून
मेढा मा.ना.सर्वोच्च न्यायालय, दिल्ली,मा.ना. उच्च न्यायालय मुंबई व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई यांच्या आदेशानुसार जावली तालुका विधी सेवा समिती, जावली तालुका वकील संघ तसेच आर्ट ऑफ लिव्हींग शाखा मेढा यांचे संयुक्त विदयमाने दि. २१/०६/२०२६ रोजी स.७.३० वा.दिवाणी व फौजदारी न्यायालय मेढा येथे आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त योग शिबीराचे आयोजन करण्यात आलेले होते.
सदर शिबीरास दिवाणी न्यायाधीश, मेढा डॉ. विक्रम आव्हाड, सातारा येथील ८वे सह.दिवाणी न्यायाधीश डॉ.संगीता व्ही.आव्हाड,जावली तालुका वकील संघाचे अध्यक्ष विधीज्ञ आर एस पोफळे, विधीज्ञ श्रीमती.पी.डी.गोरे,सहा. सरकारी अभियोक्ता श्रीनिवास कणसे,आर्ट ऑफ लिव्हींगचे सदस्य प्रविण पवार,विवेक सरडे,शितल पवार,सई पवार,निकम मॅडम मेढा पोलीस स्टेशनचे कर्मचारी व मेढा न्यायालयातील कर्मचारी उपस्थीत होते.
सदरील योग शिबीरास मार्गदर्शन करताना डॉ. संगीता आव्हाड मॅडम यांनी असे सांगितले की, निरोगी व तणावमुक्त जीवन आपणास जगायचे असेल तर दररोज योगा केला पाहिजे.
आर्ट ऑफ लिव्हींगचे प्रविण पवार यांनी योग तात्पुरता नसुन कायम अंगीकारला पाहिजे व नित्यनियमाने योग साधना केली पाहिजे असे सांगितले.
जावली तालुका वकील संघाचे अध्यक्ष यांनी मार्गदर्शन करताना असे सांगितले की, आजच्या धकाधकीच्या जिवनात योग साधने शिवाय दुसरा पर्याय नाही.
त्यामुळे आपले शरीर निरोगी राहते. सहा सरकारी अभियोक्ता श्री निवास कणसे यांनी असे सांगितले की, योग केल्यामुळे आपण तानतनावातुन मुक्त होतो.
जावली तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश डॉ. विक्रम अंबादास आव्हाड यांनी असे सांगितले की,योग हीच निरोगी जिवनाची गुरूकिल्ली आहे.
योग केल्याने आपण निरोगी राहतो. ताणतणावातुन मुक्त होतो.शरीर संपदा हिच आपली मोठी संपदा आहे.त्यासाठी दररोज आपण योगा केला पाहिजे.
आर्ट ऑफ लिव्हींगच्या सदस्यांनी सर्व उपस्थीतांना विविध प्रकारची योग आसनाचे प्रत्यक्षीत करून दाखविली उपस्थीतांन कडून करून घेतली.
अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.


