शेतकरऱ्यांनी तुती लागवड व ड्रॅगनफुड लागवड करावे – गटविकास अधिकारी जगताप
कृषीदिनाचे औचित्य साधत वृक्षारोपन आणि विविध कार्यक्रम संपन्न
न्यायभूमी न्यूज
( नाशिक ) खेडलेझुंगे दि ०५ जुलै / बाबा गिते

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतरावजी नाईक यांची ११२ वी जयंती (कृषि दिन ) पंचायत समिती निफाड सभागृहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी श्रीमती नम्रता जगताप होत्या.
कार्यक्रमास सहाय्यक गट विकास अधिकारी सुनिल पाटील आणि तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार आणि तालुक्यातील पिक स्पर्धा विजेते शेतकरी तसेच तुती लागवड गटाचे कोळगाव येथील यशस्वी शेतकरी उपस्थित होती.

कार्याक्रमाच्या सुरवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले.त्यानंतर विविध पीक स्पर्धा विजेते व तुती लागवड गटाचे शेतकरी यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी सहाय्यक कृषी अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव यांनी कै.वसंतराजी नाईक यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला तर प्रकाश घोटेकर, कोळगाव यांनी तुती लागवड व रेशीम कीड संगोपन या विषयी मार्गदर्शन केले.
ए.पी.ओ.ज्ञानेश्वर धारराव यांनी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत तुती लागवड विषयी मार्गदर्शन केले.
डॉ.पंकज कळसकर पशुधन विकास अधिकारी आणि सुधाकर पवार तालुका कृषी अधिकारी यांनी पशुधन व कृषी विभागाच्या विविध योजना विषयक मार्गदर्शन केले.
सहाय्यक गट विकास अधिकारी सुनिल पाटील यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचा समारोप गट विकास अधिकारी श्रीमती नम्रता जगताप यांच्या भाषणाने झाला.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन कृषि अधिकारी ज्ञानेश्वर शिंपी यांनी केले तर कृषी विस्तार अधिकारी गौरव हिरे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कृषि विस्तार अधिकारी श्रीमती आरती जवणे आणि श्री. विनोद साबळे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमानंतर गट विकास अधिकारी जगताप यांच्या हस्ते लोणजाई माता टेकडीवर वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर विंचूर येथील प्रगतिशील शेतकरी अण्णा राऊत यांच्या बांधावर जात त्यांची ड्रॅगन फ्रुट लागवड, कोळगाव येथील घोटेकर यांची तुती लागवड व रेशीम कीटक संगोपन गृहास भेट देवुन प्रकल्पाची संपुर्ण माहिती घेतली.
यावेळी पंचायत समिती कृषी अधिकारी, कृषि विस्तार अधिकारी,विस्तार अधिकारी ग्राम पंचायत सह महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना व घरकुल विभागाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.


