Breaking
महाराष्ट्र

“श्री.वेण्णा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज मेढा येथे जागतिक लोकसंख्या दीन साजरा”

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 0 0 0 1

न्यायभूमी न्यूज 

मेढा,दि.१२ जुलै विशेष प्रतिनिधी 

मा.ना.सर्वोच्च न्यायालय,दिल्ली,मा.ना.उच्च न्यायालय,मुंबई,महाराष्ट राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई, आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,सातारा यांचे आदेशान्वये शुक्रवार (ता.११) रोजी सकाळी ०९.०० ते १०.०० वाजेपर्यंत जागतिक लोकसंख्या दिना निमित्त जनजागृती शिबीर डॉ.विक्रम आव्हाड, दिवाणी न्यायाधीश,क.स्तर,तथा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मेढा यांच्या वतीने जागतिक लोकसंख्या दिन विषयक जनजागृती शिबीर घेण्यात आले.

श्री.वेण्णा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज मेढा चे मुख्याध्यापक बी.बी.पाटील,तालुका वकील संघाचे अध्यक्ष आर.एस.पोफळे मेढा,ॲड.ए के शेटे,ॲड. एन.एस.पवार,ॲड.ए.ए.लकडे महाविदयालयातील प्राध्यापक व विद्यार्थी,विद्यार्थिनी व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते. 

सदर कायदे विषयक जनजागृती कार्यक्रमात जागतिक लोकसंख्या,शिक्षणाचा अधिकार,बेटी बचाव बेटी पढावो विषयक जनजागृती शिबीर घेण्यात आले.हे शिबिर घेण्यामागील उद्देश काय आहे.

तसेच लोक संख्या वाढल्यामुळे आपल्या सर्वांचे किती नुकसान झाले,वातावरणाची हानी किती झाली, नैसर्गिक साधन संपत्तीचे नुकसान कसे झाले, महागाई किती वाढली व त्याच्या फायद्या पेक्षा तोटे च किती आहेत ॲड ए के.शेटे यांनी याविषयी मार्गदर्शन केले. 

शिक्षणाचा अधिकार व तो अधिकार कसा मिळवला पाहिजे.त्याचे फायदे किती आहेत.त्या विषयी कायद्याने ठरवून दिलेले आपले हक्क कोणते आहेत, त्याचे असणारे फायदे व लाभ या विषयी मार्गदर्शन केले. 

               तसेच ॲड.ए ए लकडे यांनी बेटी पढावो बेटी पढावो या विषयावर मुलींना कायदे विषयक मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री बी बी पाटील यांनी सगळ्या विषयांवर आपले मोलाचे मार्गदर्शन केले. 

 

      या शिबिराचे प्रमुख पाहुणे श्री डॉ विक्रम अं . आव्हाड दिवाणी न्यायाधीश,क.स्तर,तथा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मेढा यांनी जागतिक लोकसंख्या दिन,शिक्षणाचा अधिकार,बेटी बचाव बेटी पढावो या विषयावर विद्यार्थी विद्यार्थिनीना हसत खेळत त्याचे महत्त्व पटवून दिले.

तसेच महाराष्ट्र विद्यापीठ,बोर्ड आणि इतर विशिष्ट परीक्षांमधील गैरप्रकार प्रतिबंधक कायदा, १९८२ या कायद्यानुसार,परीक्षांमध्ये कॉपी करणे किंवा कॉपी करण्यास मदत करणे.

दोन्ही गुन्हेगारी कृत्ये,विशाखा समिती व अँटी रॅगिंग समिती या विषयी विचार करणारे संभाषण प्रत्येक विद्यार्थी व विद्यार्थिनींन सोबत केले.त्या वेळी न्यायालयाचे कर्मचारी संदीप मोरे,अवधूत कुलकर्णी,प्रशांत लिंगडे, मनोज कांबळे,कोंडीबा शिंदे,आकाश साबळे या सर्वांनी विशेष योगदान दिले.

1/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे