Breaking
कृषीवार्ता

छत्रपती शिवाजी महाराज बळीराजा कृषी सन्मान -2025 चा पुरस्कार जाहीर

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 2 0 9 7

न्यायभूमी न्यूज

कोटमगाव दि १४ जुलै  ज्ञानेश्वर भवर

सविस्तर वृत्त असे की, सलादे बाबा प्रतिष्ठान वडनेर भैरव नासिक यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज बळीराजा कृषी सन्मान- 2025 च्या पुरस्काराचे दरवर्षी वितरण करण्यात येते.

याही वर्षी दिनांक 12 -7-2025 रोजी सायं 6-00 हॉटेल दौलत फुट मॉल,मुंबई आग्रा हायवे शिरवाडे वनी ता़ निफाड( नाशिक) येथे आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाची सर्वात महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री श्री. माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्वागत अध्यक्ष मा.श्री. पोपटराव पवार मार्गदर्शक कार्याध्यक्ष श्री.गौतम बाप्पू पाटील ट्रस्टचे आधारस्तंभ यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली.

याचबरोबर वडनेर भैरव,चांदवड,नाशिक जिल्ह्यातील विशेष प्रमुख पाहुण्यांचे सत्कार समारंभ व शेतकरी,बळीराजाचा मान।। बळीराजाचा सन्मान,करण्यात आला.

या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य कृषिमंत्री माननीय श्री.माणिकराव कोकाटे खासदार श्री.भास्कर भगरे माननीय आमदार श्री.राहुल दादा आहेर माननीय आमदार श्री.दिलीप काका बनकर मा. श्री.श्रीराम शेटे माननीय श्री. भाऊसाहेब चौधरी मविप्र मंडळाचे सरचिटणीस श्री.नितीन जी ठाकरे साहेब मा.आ.श्री उत्तम बाबा भालेराव.मा. श्री.रावसाहेब भालेराव मा.श्री.गणेश निंबाळकर अँड.मा.श्री.पोपटराव पवार मा.श्री.गौतम बापू पाटील हे उपस्थित होते. याचप्रमाणे याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराज बळीराजा कृषी सन्मान -2025 पुरस्कार हा पुरस्कार मा.श्री.सुरेश भास्कर गायकवाड बहादुरी तालुका – चांदवड जिल्हा नाशिक श्री आत्माराम निवृत्ती मोहिते दरसवाडी तालुका चांदवड येथील प्रगतशील शेतकरी यांना मिळाला.

या कार्यक्रमाच्या आयोजन प्रतिष्ठानचे संस्थापक श्री .सुरेश सलादे सर अध्यक्ष श्री.मनोहर नाना पाटोळे उपाध्यक्ष श्री.रामचंद्र अण्णा मोरे सरचिटणीस श्री.राहुल पाचरकर विश्वस्त मंडळ विश्वस्त मंडळ श्री.दत्तात्रय गणपत निखाडे श्री. महेंद्रसिंग छगनसिंग परदेसी श्री.मान सिंग राजाराम ढोमसे श्री.सुरेश दादा उशीर श्री.दीपक आण्णा पाचोरकर श्री.नंदकिशोर साहेबराव मोहिते श्री.उत्तम भास्कर राव भोसले श्री.मंगेश भाऊसाहेब पवार श्री.नवनाथ शिवराम कोठुळे श्री.किशोर विष्णू शिरसाठ श्री.अनिल बाबुराव पवार तसेच संयोजक नाथ कृपा इव्हेंट नासिक आरती जाधव व मानसिंग डोमसे या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 2 0 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे