Breaking
महाराष्ट्र

नाशिक ते बारागाव पिंपरी मुक्कामी असलेली बस सेवा सुरू करावी

न्यायभूमी न्युज संस्थापक पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 9 5 3 0 3

न्यायभूमी   

नासिक दि. २९ नोव्हेंबर ज्ञानेश्वर भवर 

  पंचवटी आगारातून ही बस सायंकाळी ६ वाजता सुटून सी.बी.एस.नासिक रोड शिंदे गाव ब्राह्मणवाडे जायगाव देशवंडी सुळेवाडी बारागाव पिंपरी येथे ८ वाजता मुक्कामी तसेच ही बस गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून अखंड बस सेवा सुरू होती.

परंतु पंचवटी आगार प्रमुखांनी कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता ही बस ४ महिन्यांपासून बस सेवा बंद केलेली आहे.

त्यामुळे वरील गावांसह पाट पिंपरी निमगाव गुळवंच केपानगर इत्यादी गावांतील शेतकरी वर्ग नोकरदार शालेय विद्यार्थी महिला वर्ग ज्येष्ठ नागरिक इत्यादी प्रवासी वर्गांचे जाणे येण्याचे गैरसोय होत आहे.

ही बस सेवा लवकरात लवकर सुरू करण्याचे निवेदन श्री दत्तात्रय गोसावी (सामाजिक कार्यकर्ते बारागाव पिंपरी) यांनी मा.श्री.उमेश बिरारी साहेब वरिष्ठ( पंचवटी आगार व्यवस्थापक नाशिक) तसेच (विभागीय वाहतूक अधीक्षक नाशिक) कल्याणी ढगे मॅडम यांना देण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 5 3 0 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे