दोधेश्र्वर पब्लिक स्कूलमध्ये भारतीय संस्कृतीला अनुसरून पारंपरिक पद्धतीने संक्रांत साजरी
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
सटाणा नासिक: दि १४ जानेवारी उत्तम गारे
सटाणा येथिल दोधेश्र्वर पब्लिक स्कूलमध्ये भारतीय सण-उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. भारतीय कालगणना आणि त्या अनुषंगाने येणारे सण-उत्सव आणि त्यांचे महत्व याची माहिती या पिढीला व्हावी.
तसेच त्यांच्यावर योग्य संस्कार व्हावेत या हेतूने सर्व सण-समारंभ साजरा करण्याची परंपरा ही शाळेच्या “उत्तम शिक्षण, उत्तम संस्कार” या ब्रीदवाक्याप्रमाणे जोपासली जाते. त्यानुषंगाने आज संक्रात सण साजरा करण्यात आला. यावेळी बोरन्हाण, सुगड पुजन, पतंग, रांगोळी अशा विविध परंपरेच्या माध्यमातुन संक्रांत साजरा करुन विद्यार्थ्यांमध्ये एक विशेष कुतूहल निर्माण झाले होते.
त्याच प्रमाणे महिला शिक्षकांनी यावेळी सर्व विदयार्थी व शिक्षकांसाठी खिचडी बनवण्यात आली. शाळेत चूल मांडून चुलीवर ही खिचडी शिकवण्यात आली. आजच्या आधुनिक काळात चूलही संकल्पना शहरी भागात दिसेनाशी झाली आहे. त्यामुळे हा अनुभव सर्वांसाठी विलक्षण आनंद देणारा होता.
यानंतर सर्व विद्यार्थ्याना खिचडी, मुरमुर्ऱ्याचे लाडू, तीळीचे, शेंगदाण्याचे, डाळीचे लाडू असे जेवण देण्यात आले. अत्यंत आनंदाने विदयार्थी व शिक्षकांनी हे जेवण करुन हे खाद्यपदार्थ बनविणाऱ्या शिक्षिका आणि संक्रांत परिपूर्ण भारतीय संस्कृतीला अनुसरून साजरी करण्यात आली त्याबद्दल अभिनंदन केले.
त्याचप्रमाणे प्रिप्रायमरी विभागातील शिक्षकांनाही पतंगोत्सव साजार करून लहान लहान चिमुकल्यांना तिळगुळ भरवत शुभेच्छा दिल्यात.
या सर्व कार्यक्रमाचे मार्गदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रुती शेट्टी यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी अंजली विसपुते, वर्षा कापडणीस, अमृता जाधव, रुपाली जाधव, विद्या पवार, प्रतिभा खैरनार, वर्षा जगताप, जयश्री पवार, मनीषा सोनवणे वृषाली खैरनार, माधुरी देवरे, पुजा जाधव तसेच कार्यालयीन प्रमुख दादा खरे शिक्षक दिपक पाटील, राहुल येशी, विनय वालीया, किशोर चव्हाण, वैशाली पगार, अर्चना पाटील, रोशनी पाटील, माहेश्र्वरी कापडणीस, नेहा बागुल यांसह पुजा अहिरे, योगिनी जाधव, संगीता पवार, चंदा वाघ, शरद निरभवणे, निलेश गरूड, हर्षल बोरसे यांनी सहकार्य केले.



