Breaking
गुन्हेगारी

देवगावमध्ये घरफोडी; रोख २० हजारांसह सोन्याची नथ व कानातील झुबे चोरीला

परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

1 2 7 9 9 2

न्यायभूमी 

 लासलगाव दिनांक १५ ऑक्टोंबर कैलास उपाध्ये 

 निफाड तालुक्यातील महादेवनगर, देवगाव शिवारात अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील दरवाजाची कडी – कोयंडा तोडून घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे.

या चोरीत २० हजार रुपये रोख आणि सोन्याचे दागिने असा एकूण ३० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. ही घटना दिनांक १३ ऑक्टोबरच्या रात्री ११ ते १४ ऑक्टोबरच्या पहाटे ५ वाजेदरम्यान घडली.

       याबाबत गोरख विश्वनाथ हांडोरे, यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. हांडोरे हे पत्नी रंजना आणि मुलगा कृष्णा यांच्यासह राहतात. रात्री जेवण झाल्यानंतर कुटुंबातील सर्वजण घरातील बैठकीच्या खोलीत झोपले होते. दिनांक १४ ऑक्टोबर रोजी पहाटे पाच वाजता हांडोरे हे जनावरांना चारा – पाणी करण्यासाठी उठले असता त्यांना घराच्या मागील बाजूचा दरवाजा उघडा दिसला.

जवळ जाऊन पाहिले असता मागील पडवीच्या दरवाजाची कडी – कोयंडा तोडलेला होता. घरात जाऊन पाहणी केली असता बैठकीच्या खोलीमागील पडवीतील लोखंडी कपाट अर्धवट उघडे आणि त्याचे लॉकर तुटलेले दिसले. घरातील कपडे व इतर सामान अस्ताव्यस्त पडलेले होते.

कपाटाची तपासणी केली असता लॉकरमध्ये ठेवलेले २० हजार रुपये रोख, पत्नीची एक ग्रॅम वजनाची सोन्याची नथ आणि पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील झुबे चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. चोरीस गेलेल्या ऐवजाची एकूण किंमत ३० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

     दरम्यान, याच रात्री महादेव नगर, देवगाव शिवारातील सुधाकर संझाजी मेमाणे आणि संजय कारभारी मेमाणे यांच्या घराच्या दरवाजाची कडी – कोयंडा तोडून चोरीचा प्रयत्न झाल्याची माहितीही समोर आली आहे. मात्र, त्यांच्या घरातून कोणतीही वस्तू चोरीला गेली नसल्याचे समजते. त्यामुळे परिसरात चोरट्यांच्या हालचालींबाबत चिंता व्यक्त होत आहे.

    घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते, पोलीस हवालदार औदुंबर मुरडनर, पोलीस हवालदार विजय पैठणकर, पोलीस शिपाई चंदू मांजरे, गणेश नागरे, कैलास घोलप आणि देवगावचे पोलीस पाटील सुनील बोचरे यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार औदुंबर मुरडनर करीत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 2 7 9 9 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे