Breaking
गुन्हेगारी

वाळू वाहतुकीच्या ‘हप्त्या’चा आरोप; शिर्डीचा पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात!

दरमहा ५० हजारांची मागणी केल्याची तक्रार; ४० हजार रुपये स्वीकारताना नाशिकच्या पथकाची कारवाई

1 4 3 3 4 5

न्यायभूमी

शिर्डी विशेष वृत्त | गुरूवार २६ नोव्हेंबर २०२६

शिर्डी परिसरात वाळू वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यासाठी दरमहा हप्त्याची मागणी केल्याच्या आरोपावरून शिर्डी शहर वाहतूक शाखेशी संबंधित पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक पथकाने रंगेहात पकडले.

अशोक रामा शिंदे (वय ४६) असे संबंधित हवालदाराचे नाव असून, त्यांच्याविरुद्ध कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त आहे.

तक्रारदार हे गौण खनिज वाळू वाहतुकीचा व्यवसाय करतात. त्यांना वाळू वाहतुकीची ऑर्डर मिळाल्यानंतर हायवा वाहनातून वाहतूक सुरू असताना संबंधित हवालदाराने वाहन अडवून कारवाई न करण्यासाठी तसेच वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यासाठी दरमहा ५० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे.

या तक्रारीनंतर २५ नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी करून सापळा रचला.

त्यावेळी दरमहा ४० हजार रुपये देण्याची मागणी मान्य झाल्यानंतर, कोपरगाव तालुक्यातील सिन्नर -शिर्डी रस्त्यालगत ४० हजार रुपये स्वीकारताना हवालदाराला पथकाने पकडल्याचे वृत्त आहे.

वाळू वाहतुकीच्या नावाखाली हप्त्यांची मागणी?

वाळू वाहतुकीशी संबंधित तक्रारी, वाहनांची तपासणी आणि कारवाईच्या अधिकारांचा गैरवापर होत असल्याचा आरोप या प्रकरणातून पुढे आला आहे.

मात्र, संबंधित आरोपांची न्यायालयीन पडताळणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे प्रकरणातील सर्व बाबी तपासातून स्पष्ट होणे आवश्यक आहे.

शासकीय कामासाठी लाच मागितली जात असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 3 3 4 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे