Breaking
महाराष्ट्र

लासलगाव येथे बंद असलेले मंडळ कृषी अधिकारी कार्यालय सुरू करण्यासाठी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मामा यांच्याकडे मा.पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील यांची मागणी

कार्यालयासाठी स्वतंत्र शासकीय इमारत, रिक्त पदे भरण्यासह पी एम किसान योजनेसाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी

1 4 2 9 2 1

न्यायभूमी 

लासलगाव: दिनांक २६ नोव्हेंबर निशिकांत पानसरे

 लासलगाव व परिसरातील शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध शासकीय योजनांचा लाभ घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी तसेच कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे बंद असलेले मंडळ कृषी अधिकारी कार्यालय तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी मा. पंचायत समिती सदस्य प्रकाश सर्जेराव पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री मा. ना. श्री. दत्तात्रय भरणे यांची समक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले.

      लासलगाव हे महाराष्ट्रातील प्रमुख कांदा बाजारपेठांपैकी एक असून, लासलगाव मंडळांतर्गत तब्बल ४६ गावांचा समावेश आहे. परिसरातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजना, अनुदान, पीकविषयक मार्गदर्शन व इतर शासकीय कामांसाठी लासलगाव येथेच सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. मात्र, मंडळ कृषी अधिकारी कार्यालयात आवश्यक कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने कार्यालयीन कामकाजावर परिणाम होत असून शेतकऱ्यांना अनेक कामांसाठी सुमारे १५ किलोमीटर दूर असलेल्या तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत आहे.

       याशिवाय प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, योजनेतील नवीन नोंदणी, ई-के वाय सी, आधार-बँक खाते संलग्नता, अर्जातील त्रुटी व हप्त्यांसंदर्भातील समस्यांसाठी शेतकऱ्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत.

या पार्श्वभूमीवर लासलगाव येथे मंडळ कृषी अधिकारी कार्यालयासाठी स्वतंत्र शासकीय इमारत उभारावी, लिपिक, शिपाई, तंत्र सहाय्यक, ट्रेसर आदी आवश्यक कर्मचारी तातडीने उपलब्ध करून द्यावेत, कार्यालय नियमित सुरू ठेवण्यासाठी कायमस्वरूपी मनुष्यबळ नियुक्त करावे, तसेच पी एम किसान योजनेसाठी स्वतंत्र प्रशिक्षित कर्मचारी नियुक्त करावा, अशा प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ स्थानिक स्तरावर मिळावा, यासाठी लासलगाव येथे शेतकरी सुविधा केंद्राच्या धर्तीवर स्वतंत्र व सुसज्ज सेवा व्यवस्था निर्माण करण्याची मागणीही करण्यात आली आहे. यावेळी आमदार दिलीप काका बनकर, द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले, शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे कारसूळचे सरपंच देवेंद्र काजळे हे उपस्थित होते

      निवेदनाच्या प्रती कुंभमेळा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. गिरीशजी महाजन, महाराष्ट्र राज्याचे मंत्री मा. ना. श्री. छगनरावजी भुजबळ, विभागीय कृषी सहसंचालक, नाशिक विभाग तसेच उपविभागीय कृषी अधिकारी, निफाड यांना माहितीस्तव व आवश्यक कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्या आहेत.

 

• कृषिमंत्री महोदयांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक प्रशासकीय कार्यवाही करावी, लासलगाव व परिसरातील शेतकऱ्यांची गैरसोय दूर करून त्यांना स्थानिक पातळीवर कृषी विभागाच्या सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार असून, लासलगाव येथे बंद असलेले मंडळ कृषी अधिकारी कार्यालय पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत.

– प्रकाश सर्जेराव पाटील 

मा. पंचायत समिती सदस्य 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 2 9 2 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे