Breaking
कृषीवार्ता

पालखेड धरणातून २५ दिवसांचे आवर्तन सुरू; शेतकऱ्यांना दिलासा

1 4 2 9 2 1

न्यायभूमी

लासलगाव | दिनांक २५ नोव्हेंबर निशिकांत पानसरे

नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून, माजी मंत्री तथा आमदार छगनरावजी भुजबळ यांच्या सूचनेनुसार आणि ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे बुधवार, दि. २५ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ठीक ८ वाजता पालखेड धरणातून शेती सिंचनासाठी आवर्तन सोडण्यात आले.

 

हे आवर्तन २५ दिवसांचे असून, परिसरातील शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. रब्बी हंगामातील पिकांना सिंचनासाठी आवश्यक पाणी उपलब्ध होण्यास या आवर्तनाचा मोठा आधार मिळणार आहे.

नियोजित वेळेत आवर्तन सुरू झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा असून, शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.

याबाबतची माहिती डॉ. मोहन शेलार, जिल्हाध्यक्ष, जलचिंतन सेल, नाशिक यांनी दिली.

— डॉ. मोहन शेलार

जिल्हाध्यक्ष, जलचिंतन सेल, नाशिक 

3.5/5 - (2 votes)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 2 9 2 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे