Breaking
कृषीवार्ता

के जी एस साखर कारखाना कडून थकीत ऊसाचे पेमेंट अदा

दुष्काळाची परिस्थिती असताना के जी एस कडून शेतकऱ्यांना दिलासा

1 4 0 1 8 9

न्यायभूमी 

लासलगाव दिनांक १९ नोव्हेंबर कैलास उपाध्ये 

 केजीएस शुगर कारखान्याने पूर्वीच्या कारखाना चालकाकडून थकीत 135 शेतकऱ्यांचे 1 कोटी 15 लाख रकमेचे पेमेंट चेक द्वारे अदा केले आहेत. या वेळी चेअरमन संजय होळकर यांनी नैतिक मूल्यांची जपणूक करण्यासाठी व शेतकरी बांधवांना दुष्काळी परिस्थितीत मदतीचा हाथ म्हणून होळकर कुटुंब परिवाराने थकीत देणी देण्याचा निर्णय घेतला आहे.

या पूर्वी एन सी एल टी कडून प्राप्त झालेल्या यादी नुसार सर्व शेतकऱ्यांचे थकीत पैसे अदा केले आहे परंतु फॉर्म बी न भरल्यामुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पेमेंट मिळाले नव्हते आणि हि मॅनेजमेंट ते देणं लागत नव्हते. परंतु तरीही आपला तालुका आपले ऊस पुरवठा दार शेतकरी यांचे सामाजिक बांधिलकी म्हणून देणी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

हा कारखाना नफा कमावण्यासाठी नाही तर कर्मवीर चांगदेव पाटील होळकर आणि त्यांचे मित्र कर्मवीर प्रल्हाद पाटील कराड यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी , त्याच प्रमाणे निफाड तालुक्यातील साखर कारखाने बंद पडल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची झालेली परवड थांबवण्यासाठी, तालुक्यात रोजगार निर्माण व्हावा, व विकास व्हावा.

या उद्देशाने हा कारखाना विकत घेतला आहे. या प्रसंगी प्रांत श्री मंगरूळ साहेब, तहसीलदार नाईकवाडे साहेब, पोलिस उप निरीक्षक श्री आव्हाड साहेब, प्रभाकर रायते, बाळनाथ शिंदे, रामदास शिंदे, संचालक सोनिया होळकर, किशोर होळकर, कार्यकारी संचालक आदित्य होळकर उपस्थित होते.

संचालक प्रकाश दायमा यांनी प्रास्तविक केले तर आदित्य होळकर यांनी आभार मानले.

सर्व ऊस पुरवठादार शेतकरी यांची चेअरमन संजय होळकर आणि संचालक मंडळ यांचे आभार मानले आणि यापुढे आमचा ऊस फक्त केजीएस साखर कारखान्याच देऊ आसतनिर्धार व्यक्त केला, मोठ्या संख्येने शेतकरी यावेळी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 0 1 8 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे